अहमदनगर : अटकपूर्व जामीन मंजूर होण्यासाठी मदत करण्याच्या बदल्यात 25 हजार रुपयांची लाच मागितल्याचे उघड झाले आहे. विवेक पवार ( कोतवाली पोलिस स्टशन )असे गुन्हा दाखल झलेल्या सहाय्यक पोलीस निरीक्षकाचे नाव आहे.
अहमदनगर शहरातील कोतवाली पोलीस ठाण्यात तक्रारदार व त्यांचा मावस भाऊ ,अशा चार जणांवर गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. सदर गुन्ह्यात अटकपूर्व जामिन मिळावा ,यासाठी मदत करण्याच्या बदल्यात सहाय्यक पोलीस निरीक्षक विवेक पवार यांनी तक्रारदार यांच्याकडे तीस हजार रुपयांची मागणी केली होती. तडजोडी आणि ती 25 हजार रुपये देण्याचे ठरलेले होते. दरम्यान तक्रारदार यांनी नाशिक येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केल्याने या विभागाने नगर मध्ये येऊन तांत्रिक तपासणी केली. त्यात सहाय्यक पोलीस निरीक्षक यांनी 30 हजार रुपयांची लाच घेण्याची मान्य केल्याचे समोर आले आहे.
याप्रकरणी सहाय्यक पोलीस निरीक्षक याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई नाशिक येथील प्रतिबंधक विभागाचे पोलीस निरीक्षक संदीप घुगे ,पोलीस हवालदार एकनाथ बाविस्कर, पोलीस नाईक प्रकाश महाजन ,पोलीस शिपाई नितीन नेटारे आदींच्या पथकाने केली.