अहमदनगर : मराठा आरक्षण व कायगाव टोका घटनेप्रकरणी सलग दुसऱ्या दिवशी अहमदनगर जिल्ह्याच्या ग्रामीण भागात ठिकठिकाणी बंद पाळण्यात येत आहे. मंगळवारी बंद पाळलेल्या ठिकाणांशिवाय इतरत्र बुधवारी बंद पाळण्यात येत आहे. मंगळवारी रात्री अहमदनगर-कान्हूर पठार या एस. टी. बसवर कल्याण रस्त्यावरील रेल्वे पुलावर दगडफेक करण्यात आली. या बसमधील प्रवाशांना खाली उतरवून बसची तोडफोड करण्यात आली. त्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून एस. टी. प्रशासनाने अहमदनगरमधून बाहेर जाणाºया सर्व बसफेºया बंद ठेवल्या आहेत.नगर तालुक्यातील जेऊर बायजाबाई, शेवगाव तालुक्यातील मुंगी, बालमटाकळी येथे कडकडीत बंद पाळण्यात आला. बालमटाकळीत गावातून फेरी काढण्यात आली. नेवासा तालुक्यातील पाचेगावात शोकसभा घेऊन सर्व व्यवहार बंद ठेवण्यात आले. पारनेर तालुक्यातील निघोज, श्रीगोंदा तालुक्यातील विसापूर, ढवळगाव येथे कडकडीत बंद पाळण्यात आला. पारनेर आगाराची विसापूर-सुरेगाव मुक्कामी एस. टी. बस रात्रीच पुन्हा परत गेल्याने विद्यार्थ्यांना महाविद्यालयात जाता आले नाही. विसापूरमधील शाळा-महाविद्यालय बंद होते. मढेवडगावात कडकडीत बंद होता. आढळगाव येथे काल व आजही सर्व व्यवहार सुरळीतपणे सुरू होते. राहुरी बसस्थानकातून एकही बस धावली नाही. राहुरीत मंगळवारी देखील बंद पाळण्यात आला होता. पाथर्डी तालुक्यातील मिरी, मोहोज, जवखेडेसह परिसरात बंदला १०० टक्के प्रतिसाद मिळाला. मिरीत टायर जाळून सरकारचा निषेध नोंदविण्यात आला.आश्वी खुर्द येथे १०० टक्के बंद होता. नेवासा तालुक्यातील भेंडा येथे मंगळवारीच बंद पाळण्यात आला.
अहमदनगरमधील बससेवा पूर्ण बंद ; कल्याण रोडवर बसवर दगडफेक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 25, 2018 12:16 PM