शहरं
Join us  
Trending Stories
1
राहुल गांधी, खर्गेंना विनोद तावडेंची कायदेशीर नोटीस; पैसे वाटप प्रकरण तापणार
2
“युगेंद्र पवार आमदार होणार, महाविकास आघाडीला १६० जागा मिळणार”; जितेंद्र आव्हाडांचा दावा
3
नेत्रदिपक भरारी! शेतकऱ्याच्या लेकीने रचला इतिहास; अवघ्या १९ व्या वर्षी झाली पायलट
4
“विधानसभेच्या निकालानंतर शरद पवार महायुतीसोबत येऊ शकतात”; नारायण राणेंचे सूचक विधान
5
ईव्हीएम, कर्मचाऱ्यांसाठी वापरलेल्या एसटी बसमध्ये सापडली 500 रुपयांची बंडले; कोणाची? 
6
जास्त जागा त्याचा मुख्यमंत्री? मविआचा फॉर्म्युला काय ठरला? काँग्रेस नेत्यांनी सगळेच सांगितले
7
AUS vs IND Day 1: बुमराहचा 'चौकार'! २ सत्र गाजवणारा ऑस्ट्रेलियन संघ दिवसाअखेर बॅकफूटवर
8
समंथा रुथ प्रभू बनली सर्वात लोकप्रिय भारतीय सेलिब्रिटी; करिना, दीपिकालाही टाकलं मागे
9
ए आर रहमान यांचं गिटारिस्टसोबत अफेअर? चर्चांवर लेकानेच केलं भाष्य; म्हणाला, "निराश झालो..."
10
५१ चौकार, २९७ धावांचा पाऊस... वीरेंद्र सेहवागचा मुलगा आर्यवीरचा धुमधडाका, पण Ferrari थोडक्यात हुकली
11
घडामोडींना वेग! मनसे नेते बाळा नांदगावकरांनी घेतली देवेंद्र फडणवीसांची भेट; बैठकीत काय घडले?
12
शरद पवारांचा एक्झिट पोलचा आकडा काय? शेवटपर्यंत मतमोजणी केंद्र न सोडण्याचे आदेश
13
जिद्दीला सलाम! आई-बाबांचा मृत्यू; दोन्ही पायांनी दिव्यांग असूनही करतो डिलिव्हरी बॉयचं काम
14
माहिममध्ये मोठा खेळ झाला? भाजपच्या नेत्याचा निवडणुकीनंतर ठाकरे गटात प्रवेश 
15
दहा अंकी मोबाईल नंबर तरुणाला करणार करोडपती? साउथच्या सिनेमाने घातलाय 'गोंधळ'; वाचा नेमकं प्रकरण
16
कॅनडातील विमानतळांवर भारतीयांची अतिरिक्त तपासणी होणार नाही; या घोषणेनंतर ट्रुडो सरकारने निर्णय बदलला
17
Adani प्रकरणी SEBI ची पहिली प्रतिक्रिया; अमेरिकेच्या आरोपांवर केलं 'हे' वक्तव्य
18
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :'नवरीचा पत्ता नाही आणि यांनी लग्नाची तयारी केली'; नारायण राणेंचा महाविकास आघाडीवर हल्लाबोल
19
'भाजप सरकार आल्यावर वीज अन् पाण्याची बिले भरावी लागतील', अरविंद केजरीवालांचे टीकास्त्र
20
IND vs AUS : 'जानी दुश्मन' ठरला एकदम 'सस्ता'; हर्षित राणाची पहिली विकेट एकदम झक्कास (VIDEO)

अहमदनगर शहर : आमदारांच्या वचनांचे ऑडिट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 24, 2019 12:39 PM

मतदारसंघात शहर सुधारित पाणीपुरवठा व अमृत योजनेंतर्गत हाती घेण्यात आलेल्या भुयारी गटार योजनेमुळे शहरातील अंतर्गत रस्त्यांची दुरवस्था झाली आहे.

अहमदनगर : मतदारसंघात शहर सुधारित पाणीपुरवठा व अमृत योजनेंतर्गत हाती घेण्यात आलेल्या भुयारी गटार योजनेमुळे शहरातील अंतर्गत रस्त्यांची दुरवस्था झाली आहे. शहरासह उपनगरांतील रस्त्यांवर मोठ्या प्रमाणावर खड्डे पडले आहेत. मागील निवडणुकीत अंतर्गत रस्त्यांचे दिलेले आश्वासन पूर्ण झालेले नाही़ वाडियापार्क क्रीडासंकुलाचा मुद्दा अद्यापही प्रलंबित आहे. तसेच शहरातील मोठी अतिक्रमणे अजूनही तशीच आहेत.आमदाराचे नाव : संग्राम जगतापमतदारसंघ : अहमदनगर शहरटॉप 5 वचनं1 रोजगार निर्मिती2 सीना नदी सुशोभिकरण3 झोपडपट्टीमुक्त नगर4 विकास आराखड्याप्रमाणे रस्ते विकास5 कचरा खत प्रकल्पवचनांचं काय झालं?1 एमआयडीसीतील बंद आयटी पार्क सुरू2 सीना सुशोभिकरणाचा प्रस्ताव लालफितीत3 रामवाडी झोपडपट्टीचा प्रश्न प्रलंबित4 वाहतुकीचा प्रश्न जैसे थे5 कचरा विल्हेवाटीची अद्याप प्रतीक्षाहे घडलंय...1 बाळासाहेब देशपांडे दवाखान्यात नवीन मशिनरी2 तपोवन, बोल्हेगाव रस्त्याचे काम मार्गी3 केडगाव लिंक रोडचे काम पूर्ण4 सीना नदी पात्राचे रुंदीकरण5 प्रमुख चौकांत हायमास्टचा प्रकाशहे बिघडलंय...1 नगर शहरातील अंतर्गत रस्त्यांची दुरवस्था कायम2 भूसंपादनामुळे तपोवन रस्त्याच्या कामात अडचणी3 उड्डाणपुलाचे काम अद्याप सुरू नाही4 नाट्यगृहाचे भिजत घोंगडे कायमविधीमंडळातील कामगिरीसंग्राम जगताप सांगतात, अधिवेशनात गेल्या पाच वर्षांत अनेक प्रश्न उपस्थित केले. सीना नदीपात्राचा प्रश्न उपस्थित केला होता. त्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांनी नदी पात्रातील अतिक्रमणे काढून पात्र रुंद केले. उड्डाणपुलाचा प्रश्न वेळोवेळी उपस्थित केला. या कामाला कार्यारंभ आदेश देण्यात आला आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याच्या जागेचा प्रश्न उपस्थित केला. त्यावर कार्यवाही सुरू आहे.विद्यापीठाचे उपकेंद्र कार्यान्वित करण्याची मागणी आपण सभागृहात वारंवार केली आहे.एमआयडीसीतील बंद पडलेला आयटी पार्क सुरू करण्यासाठी अनेकांनी प्रयत्न केले. पण ते शक्य झाले नाही. आमदार संग्राम जगताप यांनी बंद पडलेला आयटी पार्क सुरू केला. त्यामुळे रोजगाराच्या संधी उपलब्ध झाल्या आहेत. नवीन उद्योगांकरीता जागा उपलब्ध होण्यासाठी पाठपुरावा करण्याची गरज आहे. - अशोक सोनवणे, संस्थापक , आमी संघटना, नागापूरगेल्या पाच वर्षात रस्त्यांची कामे चांगली झाली आहेत. बंद पडलेला आयटी पार्क सुरू झाला. त्यामुळे स्थानिक युवकांना रोजगार उपलब्ध होत आहे. नगर- पुणे रेल्वे मार्गासाठी पाठपुरावा करणे गरजेचे आहे. ही रेल्वे सुरू झाल्यास नगरचा विकास आपोआप होईल. - प्रा. बी. एन. शिंदेका सुटले नाहीत प्रश्न?केंद्र व राज्यात भाजपची सत्ता असल्याने निधी मिळविण्यात अडचणी आल्या. झोपडपट्टी मुक्त शहरासाठी राज्य शासनाकडे पाठपुरावा केला. रामवाडी झोपडपट्टीचा प्रश्न केंद्राशी संबंधित असल्याने तो सुटला नाही. सीना नदी सुशोभिकरणाच्या दृष्टीने पात्र रुंदीकरणाचे काम पूर्ण झाले. सुशोभिकरणाचा प्रस्ताव तयार करून तो शासनाला सादर करण्यात आला आहे. उड्डाणपुलाच्या कामासाठी वेळोवेळी आंदोलने केली. या कामाचा कार्यारंभ आदेश देण्यात आला आहे, असे जगताप यांनी सांगितले.1 मूलभूत सेवा सुविधा योजनेंतर्गत मंजूर झालेला १० कोटींचा निधी सार्वजनिक बांधकाम विभागाला प्राप्त.2 शहर स्वच्छतेसाठी शासनाकडून मिळालेला3 - २७ कोटींचा निधी महापालिकेत पडून आहे.2019 मध्ये शहर सुधारित पाणीपुरवठा योजनेच्या कामाला वेळोवेळी मुदतवाढ दिली गेली. मात्र पाणी योजनेचे काम पूर्ण झालेले नाही.पाच वर्षांत काय केलं?मागील पाच वर्षात मतदारसंघात बुरुडगाव, केडगाव लिंक रोड, सीना नदी पात्राचे रुंदीकरण, यासारखी कामे करण्यात आली. तसेच तपोवन रस्ता, बोल्हेगाव रस्त्याचे काम मार्गी लावले. तरुणांना रोजगारासाठी इतर शहरांत जावे लागते. त्यांना नगर शहरातच रोजगार मिळावा यासाठी गेल्या तीन वर्षांपासून पाठपुरावा करत होतो़ त्याला यश आले. नागापूर औद्योगिक वसाहतीतील बंद असलेला आयटी पार्क सुरू करण्यात आला असून, रोजगाराच्या संधी उपलब्ध होत आहेत.मतदारसंघातील रस्त्यांसाठी विविध योजनांच्या माध्यमातून २० कोटी रुपयांचा निधी पाच वर्षांत आणला. याशिवाय आमदार स्थानिक विकास निधीतून रस्त्यांची कामे पूर्ण करण्यात आली असून, प्रमुख चौकांत हायमास्ट दिवे बसविण्यात आले आहेत. मात्र तरीही अनेक ठिकाणी रस्त्यांची दयनीय अवस्था झाली आहे. त्यामुळे काही ठिकाणी नागरिकांना आजही चिखलातून प्रवास करावा लागत आहे.मतदार संघाला काय हवंउद्योगांसाठी पोषक वातावरणतरुणांना हव्यात रोजगाराच्या संधीनियमित कच-याचे संकलनहद्दवाढीतील उपनगरांत पायाभूत सुविधासुरक्षित वाहतूक व्यवस्थात्यांना काय वाटतं?मतदारसंघात मोठ्याप्रमाणात विकास कामे केली़ औरंगाबाद- मनमाड रस्त्याला जोडणाºया तपोवन रस्त्याचे काम गेल्या २५ वर्षांपासून रखडले होते़ शासनाकडे पाठपुरावा करून हे काम मार्गी लावले़ पाच वर्षापूर्वी दिलेल्या आश्वासनांपैकी रोजगार उपलब्ध करून देण्याचे एक आश्वासन दिलेले होते़ त्यासाठी गेल्या १९ वर्षांपासून बंद असलेला आयटी पार्क सुरू केला़ पहिल्या टप्प्यात ७ ते ८ आयटी कंपन्या नगरमध्ये आल्या आहेत़ इतरही काही कंपन्यांशी चर्चा सुरू आहे़ - संग्राम जगताप, आमदार

 

टॅग्स :AhmednagarअहमदनगरSangram Jagtapआ. संग्राम जगतापNCPराष्ट्रवादी काँग्रेस