शहरं
Join us  
Trending Stories
1
कट्टर नेत्यांच्या बंडामुळे चिंता; दाेन दिवस मनधरणीचा फराळ, वर्षानुवर्षे संघ अन् भाजपत सक्रिय असलेल्यांचेच धक्के
2
आजचे राशीभविष्य, २ नोव्हेंबर २०२४: पूर्ण दिवस आनंद व उत्साहात जाईल, कामे सफल होतील!
3
भीषण आगीत सिलेंडरचा स्फोट; चार दुकाने जळून खाक! मुंब्रा-शिळफाटा परिसरातील घटना
4
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Live Updates: एकीकडे अब्दुल सत्तार यांना दणका, दुसरीकडे अरविंद सावंतांवर गुन्हा
5
महायुतीच्या प्रचाराचा प्रारंभ कोल्हापुरातून, मंगळवारी ‘तपोवन’वर होणार पहिली सभा 
6
लक्ष्मीपूजनाच्या दिवशी सोने-चांदीत घसरण, खरेदीचा मुहूर्त साधण्यासाठी सुवर्ण पेढ्यांमध्ये उत्साह
7
मंत्र्यांच्या संपत्तीची कोटीच्या कोटी उड्डाणे, मंत्री लोढा वगळता पाच वर्षांत सर्व मंत्र्यांच्या संपत्तीत भरघोस वाढ
8
शायनांबद्दल अपशब्द; खासदार अरविंद सावंतांवर गुन्हा; विधानसभा निवडणुकीत नव्या मुद्द्याला ताेंड
9
सर्वांनी मिळून एकच उमेदवार ठरवावा : मनोज जरांगे पाटील
10
निवडणूक आयोगाचा अब्दुल सत्तार यांना दणका; मालमत्तेची खोटी माहिती दिल्याचे प्रकरण
11
मुहूर्ताला मुंबई शेअर बाजारात तेजीचे फटाके; सोने-चांदीच्या भावात घसरण
12
एमबीबीएसच्या प्रवेशांची माहिती सादर करा, महाविद्यालयांना ८ नोव्हेंबरपर्यंत मुदत
13
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सभांचाही राज्यात धडाका 
14
महायुती, मविआला अपक्षांचे आव्हान?  मुंबईतील दहा मतदारसंघांत उमेदवारांना टेन्शन
15
शिष्यवृत्तीला उशीर झाल्यास विद्यापीठ, महाविद्यालय जबाबदारउच्च शिक्षण संचालनालयाचे निर्देश; प्रलंबित अर्जांची पडताळणी करा
16
सोने करणार मालामाल, सर्व विक्रम मागे पडणार! वर्षभरात ४१ वेळा गाठला उच्चांक, दरात ३४ टक्के वाढ
17
२२ व्या मजल्यावरून उडी मारत महिलेची आत्महत्या, कासारवडवलीतील घटना
18
गिटार खरेदीमध्ये दुकानदाराला गंडा, बोगस यूपीआय क्रमांक दाखवत लुबाडले
19
दिवाळीत ट्रम्प यांचा नवा डाव, हिंदू अधिकारांच्या रक्षणाचा मुद्दा, चक्र फिरणार?
20
मतदार यादी अन् बूथ हीच आता युद्धभूमी... लोकसभेच्या पराभवानंतर भाजपची नवीन रणनीती

अहमदनगर शहरात राष्ट्रवादी की सेना?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 15, 2019 12:21 PM

नगर शहर विधानसभा मतदासंघात राष्ट्रवादी आणि शिवसेना यांच्यात थेट सामना रंगला आहे़ सेनेचा बालेकिल्ला असलेल्या नगर शहरावर गतवेळी राष्ट्रवादीने झेंडा रोवला. याहीवेळी जगताप जोरदार तयारीने उतरले आहेत. ते झेंडा कायम ठेवणार की शिवसेनेचे अनिल राठोड परत विधानसभेत पोहोचणार याची उत्सुकता आहे. 

वार्तापत्र - अण्णा नवथर नगर शहर विधानसभा मतदासंघात राष्ट्रवादी आणि शिवसेना यांच्यात थेट सामना रंगला आहे़ सेनेचा बालेकिल्ला असलेल्या नगर शहरावर गतवेळी राष्ट्रवादीने झेंडा रोवला. याहीवेळी जगताप जोरदार तयारीने उतरले आहेत. ते झेंडा कायम ठेवणार की शिवसेनेचे अनिल राठोड परत विधानसभेत पोहोचणार याची उत्सुकता आहे.  गत विधानसभा निवडणूक काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना आणि भाजप हे चारही पक्ष स्वतंत्रपणे लढले़ चौरंगी लढतीत राष्ट्रवादीचे जगताप विजयी झाले़  यावेळी आघाडी व युतीने एकास एक उमेदवार दिले आहेत़ जगताप यांच्या रुपाने राष्ट्रवादीने पुन्हा तरुण चेहरा दिला. सेनेत यावेळी अनेकजण इच्छूक होते. पण, पक्षश्रेष्ठींनी राठोड यांच्याच गळ्यात उमेदवारीची माळ टाकली. आमदार जगताप यांनी विकासासाठी ‘वन्स मोअर’, असा नारा दिला आहे़ सेनेचे राठोड हे पुन्हा भयमुक्तीचा नारा देताना दिसतात़ जगताप हे तरुणांची फौज सोबत घेऊन प्रचारात उतरले आहेत़ आयटीपार्क सुरू केल्याने शहरात तरुणांना रोजगार मिळाल्याची भूमिका ते मांडत आहेत. या तरुणांना सोबत घेऊनच त्यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. त्यांचा होम टू होम प्रचारावर भर आहे़ दोन्ही कॉंग्रेसचे नगरसेवकही त्यांच्यासाठी घरोघर जाऊन प्रचार करत आहेत. जाहीर प्रचारापेक्षा प्रत्येक नागरिकापर्यंत पोहोचून प्रचार करणे ही जगताप यांची कार्यपद्धती आहे. याहीवेळी त्यांनी ती पद्धत अवलंबली आहे. महापालिकेच्या निवडणुकीत सेना-भाजपने शहरात मोठी वातावरण निर्मिती केली होती. मात्र, जगताप यांनी एकट्याने मुकाबला करत लक्षवेधी जागा जिंकल्या होत्या. त्यामुळे त्यांची रणनिती लक्षात येत नाही. सेना-भाजप एकत्रित लढत असल्याने सेनेला मोठ्या आशा आहेत. राठोड यांची भिस्त आपल्या पारंपरिक मतांवर आहे़ त्यांच्याकडेही कार्यकर्त्यांचे जाळे आहे. मात्र, सेना-भाजपमध्ये एकवाक्यतेचा अभाव आहे. भाजपाचे माजी खासदार दिलीप गांधी व त्यांचे समर्थक असलेले नगरसेवक अजूनही प्रचारात सक्रिय नाहीत़ राष्ट्रवादीचे माजी आमदार दादा कळमकर हे आजवर जगताप यांच्या पाठीशी असत़ ते यावेळी प्रचारात दिसत नाहीत़ कळमकर यांचे पुतणे माजी महापौर अभिषेक कळमकर यांनी शिवबंधन बांधले़ राष्ट्रवादीतून बाहेर पडलेले किरण काळे वंचित, संतोष वाकळे मनसे, तर एमआयएमकडून नगरसेवक अल्ताफ शेख, भाकपकडून बहिरनाथ वाकळे हे रिंगणात आहेत. बसपाकडून श्रीपाद छिंदमही उमेदवारी करत आहेत. हे उमेदवार कोणाला फटका देणार यावर लढतीचे चित्र अवलंबून आहे. प्रचारातील मुद्दे एमआयडीसीतील बंद पडलेला आयटीपार्क सुरू करून तरुणांच्या हाताला काम दिले आहे़ यापुढील काळात आयटीपार्कमध्ये तरुणांना रोजगार उपलब्ध होईल, असा दावा संग्राम जगताप यांच्याकडून केला जात आहे़ आपण निधी आणतो मात्र, सेना कामे बंद पाडण्याचा उद्योग करते, असाही आरोप जगताप हे विविध सभांमधून करत आहेत. गेल्या पाच वर्षांत व्यापारी आणि उद्योगासाठी पोषक वातावरण तयार केले. शहरात एकही जातीय व धार्मिक तंटा झालेला नाही हाही राष्ट्रवादीच्या प्रचाराचा मुद्दा आहे़ केडगाव हत्याकांडात राठोड यांनी कसे राजकारण केले हेही जगताप सभांमधून सांगत आहेत. दहशत मुक्त नगर, गुंडगिरी आणि केडगाव हत्याकांड हे जुने मुद्दे शिवसेना प्रचारात पुन्हा मांडत आहे. शहरात नवीन उद्योग आणू, असेही आश्वासन सेना देत आहे. 

टॅग्स :PoliticsराजकारणMaharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019