अहमदनगर : राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत कोरोनाच्या काळात कंत्राटी आरोग्य कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली होती. मात्र, आता निधीच्या कमतरतेचे कारण देत या कंत्राटी कर्मचाऱ्यांना कामावरून कमी करण्यात आले आहे तसेच कोरोना रुग्णांची संख्या घटल्याने या कंत्राटी कर्मचाऱ्यांना कोणतेही काम नसल्याचे आरोग्य यंत्रणेतील अधिकाऱ्यांनी सांगितले.
१) मार्च २०२०मध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव सुरू झाल्यावर एकूण किती आरोग्य कर्मचारी कंत्राटी तत्वावर नेमण्यात आले? - १४००
२) १० सप्टेंबर २०२१पर्यंत एकूण किती कंत्राटी आरोग्य कर्मचाऱ्यांना कामावरून कमी करण्यात आले? - १२५०
जिल्हा - अहमदनगर
कमी केलेले एकूण कर्मचारी - १२५०
डॉक्टर - १५०
परिचारिका - २००
शिपाई - २००
तंत्रज्ञ - १००
रुग्णवाहिका चालक - १००
इतर - २५०
ग्रामीण भागात कोविड केअर सेंटरमधील सेवा देण्यासाठी वरील कर्मचारी नियुक्त केले होते. सध्या कोविड सेंटर बंद असून, शासकीय रुग्णालयातील कोरोना रुग्णांची संख्या कमी झालेली आहे. सध्या काही प्रमाणात रुग्ण असले तरी त्यांची सेवा करण्यास नियमित कर्मचारी पुरेसे असल्याने आरोग्य सेवांवर कोणताही परिणाम झाला नाही.
------------