अहमदनगर : जिल्ह्यातील विविध भागात अवकाळी पावसाने तडाखा दिला असून मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. वादळी वा-यामुळे अनेक शाळांचे पत्रे उडून गेले. सुदैवाने कोणत्याही प्रकारची जिवीतहानी झाली नाही.श्रीगोंदा तालुक्यातील देवदैठण शाळेचे पत्रे उडालेश्रीगोंदा तालुक्यातील देवदैठण भागाला आज सायंकाळी सहाच्या सुमारास अवकाळी वादळी पावसाचा फटका बसला. वादळामुळे शाळेवरील पत्रे उडाले तर ठिकठिकाणी झाडे व वीज खांब रस्त्यात आडवे झाले. रात्री उशिरापर्यंत झालेल्या पावसाने देवदैठणला चांगलाच फटका बसला. वाघमारे वस्ती (मेखणी) येथील जुनी इमारत असलेल्या जिल्हा परिषद शाळेवरील सोळा पत्रे वादळी वाऱ्यामुळे उडून गेले. सर्व भिंतींना जागोजागी तडे गेले. मागील भिंतही पडली. गावात ठिकठिकाणी रस्त्याच्या कडेला असलेली मोठी झाडी मुळापासून जागीच उन्मळून पडल्याने काही काळ वाहतुकीला अडथळाही निर्माण झाला. काही छपराची घरे, पोल्ट्रीचे पत्रे उडाले. गुंजाळ वस्तीवरील शेतीला वीज पुरवठा करणारे खांब पडल्याने या भागातील वीज पुरवठा खंडित झाला आहे.संगमनरेमधील सारोळे पठारच्या शाळेचे पत्रे उडालेसंगमनेर तालुक्याच्या पठार भागात दुपारनंतर वादळी वाºयासह मध्यम ते जोरदार स्वरुपाचा पाऊस झाला. सारोळेपठार व परिसरात गारपीट होऊन वादळी वाºयाने शाळेवरील पत्रेही उडाले. या पावसाचा डाळिंब व इतर नगदी पिकांना फटका बसला. वादळी वाºयासह झालेल्या पावसाने संगमनेर तालुक्याच्या पठार भागातील सारोळेपठार येथील शाळेवरील पत्रे उडून गेले.संगमनेरातील युटेक शुगरची २५ कोटींची साखर भिजलीसंगमनेर तालुक्यातील कौठे-मलकापूर येथे आज वादळी वा-यासह झालेल्या आवकाळी पावसामुळे युटेक शुगर लिमीटेड साखर कारखान्याचे जवळपास ३४ कोटी रुपयाचे अर्थिक नुकसान झाल्याचे संस्थापक रवीद्रं बिरोले यांनी सांगितले. ४ वाजेच्या सुमारास वादळी वा-यासह पावसाने हजेरी लावली. जोरदार वा-यामुळे कारखान्याच्या साखर गोदामाचे खांब निखळून पडले. गोदामाचे पत्रे १ किलोमीटर अंतरावर उडून पडले आहेत. विक्रीसाठी उपलब्ध असलेली सुमारे २५ कोटी रुपयाची साखर भिजली. सुदैवाने यावेळी कोणत्याही प्रकारची जिवीत हानी झाली नाही.कर्जत तालुक्यातील राशीनसह सिध्दटेक, खेडमध्ये वादळी पाऊसकर्जत तालुक्यातील राशीनसह परीसरातील बारडगाव, भांबोरा, चिलवडी, सिध्दटेक व खेड येथेआज दुपारी चारच्या सुमारास मेघगर्जनेसह वादळी पाऊस झाला. वादळामुळे कांदा, चारा पिके भुईसपाट झाली असून खेडमध्ये आंब्याचे मोठे नुकसान झाले. राशीनचा मंमळवारी आठवडे बाजार होता. मात्र वादळी पावसामुळे बाजारकरूंची मोठी तारांबळ उडाली. वादळी वाºयामुळे कांदा, चारापिके भुईसपाट झाल्याने शेतक-याचे मोठे आर्थिक नुकसान झाले. खेड येथे आंब्याचा सडा पडला. चिलवडी, बारडगाव, सिध्दटेक येथे अवकाळी पावसामुळे शेतीचे मोठे नुकसान झाले.