- अण्णा नवथर अहमदनगर - राज्यात फक्त उद्धव ठाकरे यांची शिवसेना आहे. त्यांचा जो आहे तो गट आहे .तो पक्ष नाही. सत्ता आहे .त्यामुळे त्यांचं सगळं काही चालू आहे आगामी २०२४ च्या निवडणुकीमध्ये सर्वांचा करत कार्यक्रम होईल, असा इशारा खासदार सुप्रिया सुळे यांनी सोमवारी येथे दिला.
अहमदनगर येथे शासकीय विश्रामगृहात खासदार सुळे यांच्या उपस्थितीत महाविकास आघाडीच्या पदाधिकाऱ्यांची बैठक झाली. या बैठकीत त्या बोलत होत्या. त्या पुढे म्हणाल्या, की आपण निवडणुकीच्या मोडमध्ये आहोत. ताकाला जाऊन भांड लपवण्याचे काही कारण नाही. अहमदनगर हा सर्वात मोठा जिल्हा आहे. या जिल्ह्यामध्ये महाविकास आघाडीचे एक मोठा कार्यकर्ता मेळावा घेण्याचे नियोजन आहे. हा मेळावा कुठे घ्यायचा हे तुम्ही सर्वजण ठरवा. त्यानुसार एक मोठा मेळावा अहमदनगर जिल्ह्यामध्ये होईल आणि या मेळाव्याला काँग्रेस शिवसेना आणि राष्ट्रवादीचे पदाधिकारी उपस्थित राहतील.
यापुढे जिल्ह्यातील तिन्ही पक्षांच्या पदाधिकाऱ्यांनी एकत्र येऊन ताकद वाढवायची आहे. देशात हुकूमशाही सरकार आहे. देशातील सरकारकडून मराठी माणसाचा कायमच अपमान केला जात आहे. राज्यामध्ये सर्वत्र राज्यामध्ये सर्वत्र आरक्षणाची मागणी होते आहे. मराठा आरक्षण मिळावे , या मागणीसाठी मराठवाड्यामध्ये उपोषण झाले. तिथे लोकांवर लाटी हल्ला झाला. त्या गावांमध्ये उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस केले नाहीत असेही सुप्रिया सुळे म्हणाल्या.
माझ्यासाठी शिवसेना फक्त एकच आहे . ती म्हणजे उद्धव ठाकरे यांचे शिवसेना. सत्ता आहे, म्हणून चालला आहे या सगळ्यांचा बाजार 24 मध्ये कार्य कार्यक्रम होईल असा आरोप खासदार सुप्रिया सुळे यांनी अहमदनगर येथील एका कार्यक्रमात केला. खासदार सुप्रिया सुळे सोमवारी अहमदनगर दौऱ्यावर होत्या त्यांनी काँग्रेस राष्ट्रवादी आणि शिवसेना या महाविकास आघाडीच्या पदाधिकाऱ्यांची शासकीय विश्रामगृहात बैठक घेतली यावेळी या बोलत होत्या.
त्या म्हणाल्या की शिवसेना राष्ट्रवादी आणि काँग्रेस या दोन्ही पक्षांच्या पदाधिकाऱ्यांनी एकत्र येऊन यापुढे काम करायचा आहे अहमदनगर जिल्ह्यातील खासदार आमदार या जागाही निवडून आणायचे आहेत. त्यासाठी सर्व पक्षांच्या पदाधिकाऱ्यांनी एकत्र यावं प्रत्येक पक्षाचा वरिष्ठ नेता आला तर तिन्ही पक्षांची पदाधिकाऱ्यांनी त्यांच्या बैठकीला उपस्थित राहिले पाहिजे. आपण आता ॲक्शन निवडणूक बोर्ड मध्ये आहे ताकाला जाऊन भांड लपवण्याचा काही कारण नाही असेही सुप्रिया सुळे म्हणाले