शहरं
Join us  
Trending Stories
1
'काँग्रेसचा खरा चेहरा समोर आला', मल्लिकार्जुन खर्गेंच्या 'त्या' वक्तव्यावर PM मोदींचा घणाघात
2
अंधेरी पूर्वेत पंधरा ते वीस दुकानांना भीषण आग;कामगार अडकल्याची भीती, अग्निशमनच्या गाड्या दाखल
3
जम्मू-काश्मीरमध्ये पुन्हा टार्गेट किलींग; 2 बिगर कश्मिरी मजुरांवर दहशतवाद्यांचा गोळीबार
4
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: काटेवाडीत पाडवा का साजरा करणार? अजित पवारांनी कारणच सांगितलं, म्हणाले...
5
कॅनडामध्ये सुपरलॅबचा भंडाफोड, मोठ्या प्रमाणात ड्रग्ज आणि शस्त्रे जप्त, भारतीय वंशाच्या व्यक्तीला अटक
6
३०० कंटेनरचे सामूदायिक लक्ष्मीपूजन; सांगवीच्या तरुणांकडे ४५० कंटेनरची मालकी
7
"बाळासाहेब असते तर थोबाड फोडलं असतं"; अरविंद सावंतांच्या वक्तव्यावर CM शिंदेंची प्रतिक्रिया
8
ऐन दिवाळीत मतदारांपर्यंत पोहचण्यासाठी दोन्ही पवारांची धावाधाव
9
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : सांगली विधानसभेत महाविकास आघाडीला धक्का! जयश्री पाटील निवडणूक लढवण्यावर ठाम
10
Maharashtra Election 2024: नाशिक पूर्वमध्ये थेट सामना; अन्य तीन मतदारसंघात तिरंगी, चौरंगी लढत
11
Muhurat Trading : मुहूर्त ट्रेडिंगनंतर तेजीसह बाजार बंद, 'या' १० शेअर्समध्ये जोरदार खरेदी, गुंतवणूकदारांनी कमावले ४ लाख कोटी
12
Mumbai Crime: फटाके फोडण्याच्या वादातून तरुणाची हत्या, मुंबईतील धक्कादायक घटना
13
जरांगेंच्या यादीला ओबीसींची यादी तयार, जो तो उठतोय त्यांनाच भेटायला जातोय; लक्ष्मण हाकेंनी रणशिंग फुंकले
14
किंग कोहलीची 'विराट' चूक; मैदानात थांबण्यापेक्षा चोरटी धाव घेण्याच्या नादात फसला (VIDEO)
15
पोस्टर'वार'! योगी आदित्यनाथ यांच्या 'बटेंगे तो कटेंगे'ला अखिलेश यादवांकडून पलटवार
16
भीषण! पाकिस्तानमध्ये मोठा बॉम्बस्फोट; ५ शाळकरी मुलं आणि एका पोलिसासह ७ जणांचा मृत्यू
17
'लॉरेन्स बिश्नोईने मला लवकर मारावे...', खासदार पप्पू यादव असं का म्हणाले?
18
IND vs NZ, 3rd Test Day 1 Stumps : फलंदाजांमुळे टीम इंडिया अडचणीत; ८६ धावांत गमावल्या ४ विकेट्स
19
"चुकीची चिठ्ठी काढणारा पोपट, आजपर्यंत...!"; शंभूराज देसाई यांचा संजय राऊतांना टोला
20
AUS vs PAK : "ऑस्ट्रेलियात पाकिस्तानने एक सामना जिंकला तर...", अक्रमने आपल्याच संघाची लाज काढली

अहमदनगरला जुन्याच निविदा नव्या दराने, बीडला फेरनिविदा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 12, 2019 4:24 AM

नगर जिल्ह्यात पिण्याच्या पाण्याच्या टँकर पुरवठ्यातील अनियमितता ‘लोकमत’ने चव्हाट्यावर आणलीच. मात्र, टँकरच्या निविदेपासूनच संशयकल्लोळ आहे.

- सुधीर लंकेअहमदनगर : नगर जिल्ह्यात पिण्याच्या पाण्याच्या टँकर पुरवठ्यातील अनियमितता ‘लोकमत’ने चव्हाट्यावर आणलीच. मात्र, टँकरच्या निविदेपासूनच संशयकल्लोळ आहे. ठेकेदारांनी शासकीय दरापेक्षा अधिक दराच्या निविदा भरल्यानंतरही जिल्हा प्रशासनाने त्या मंजूर केल्या आहेत. याबाबत मंत्रालयानेही स्वयंस्पष्ट आदेश न पाठविता संभ्रम निर्माण केला आहे.१ जानेवारी ते ३१ डिसेंबर २०१९ या कालावधीत खासगी टँकरद्वारे पाणी पुरवठा करण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयाने २६ आॅक्टोबर रोजी निविदा प्रसिद्ध केली. या निविदांना दोनवेळा मुदतवाढ देण्यात आली. अंतिम मुदतीनंतर आठ संस्थांनी एकूण १६ निविदा सादर केल्या. यापैकी श्री संत परमानंद बाबा व बबनरावजी शिंदे सहकारी मोटार वाहतूक संस्था यांची कागदपत्रे अपूर्ण असल्याचे सांगून त्यांना अपात्र करण्यात आले. तर श्री गणेश सहकारी मोटार वाहतूक संस्था, गाडे ट्रान्सपोर्ट, जामखेड वीट उत्पादकांची मोटार वाहतूक संस्था, लक्ष्मी माता श्रीरामपूर, वैभव लॉजिस्टिक नाशिक, साई सहारा इन्फ्रा अ‍ॅण्ड फॅसिलिटी पारनेर या सहा संस्थांना पात्र ठरविले गेले.प्रशासनाने अधिक दराकडे दुर्लक्ष केलेले दिसते. नगरच्या प्रशासनाने या निविदा रद्द न करता त्याबाबत १५ डिसेंबरला शासनाकडे मार्गदर्शन मागितले. आश्चर्य म्हणजे त्यानंतर चारच दिवसांत म्हणजे १९ डिसेंबरला पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्रालयाने सर्व राज्यातच टँकरचे दर वाढविण्याचा आदेश काढला. शासनाच्या या आदेशानंतर बीडसारख्या जिल्ह्यांनी पूर्वीच्या निविदा रद्द करुन नव्याने निविदा मागविल्या.असा आहे टँकरचा हिशोबपूर्वीच्या दराप्रमाणे १२ टन क्षमतेचा खासगी टँकर शासकीय पाणी पुरवठ्यासाठी दिवसभर शंभर किलोमीटर फिरला तर त्याला त्या दिवसापोटी ४ हजार २९६ रुपये मिळत होते. नवीन दरानुसार आता ७ हजार ३२० रुपये मिळतील. म्हणजे एखाद्या टँकरची एक दिवस जरी खोटी खेप दाखवली तरी त्या ठेकेदाराला सात हजार रुपये घरबसल्या मिळतील. खोट्या खेपा दाखवूनच टँकरमध्ये घोटाळा केला जातो.आम्ही बाद ते पात्र कसे?अटीशर्तीप्रमाणे आम्ही कागदपत्रे न दिल्याने आमची निविदा बाद झाली. मग, वाढीव दर असताना इतर संस्थांच्या निविदा पात्र कशा होतात? अशी तक्रार संत श्री परमानंद बाबा सहकारी मोटार वाहतूक संस्थेने मुख्यमंत्र्यांकडे केली आहे.तब्बल ७० टक्के अधिक दरराज्यात शासनाने टँकरच्या दरात तब्बल सत्तर टक्क्यांनी वाढ केली आहे. २०१२ च्या आदेशाप्रमाणे पूर्वी १ टन क्षमतेसाठी टँकरला दिवसाला १५८ रुपये भाडे होते. ते आता २७० रुपये करण्यात आले. किलोमीटरचा दर दोन रुपयांहून ३.४० रुपये केला आहे.नगरच्या जिल्हाधिकाऱ्यांनी मात्र आहे त्याच निविदाधारकांना संधी देत त्यांनी मागितलेला दर कायम केला. ‘निविदा अंतिम करण्याबाबत नवीन शासन आदेशाप्रमाणे कार्यवाही करावी’, असे संदिग्ध पत्र मंत्रालयाने २६ डिसेंबरला पाठविले. त्याच्या आधारावर जिल्हाधिकाऱ्यांनी मंजुरी दिली. मंत्रालयाने आलेल्या निविदाच वाढीव दराने मंजूर करा, असे स्पष्टपणे म्हटलेले नाही. मात्र जिल्हा प्रशासनाने तसा अर्थ काढला. तक्रारीनंतरही मंत्रालयाने स्पष्टीकरण केलेले नाही. नाशिकचे विभागीय आयुक्त राजाराम माने यांनी याबाबत चौकशी करु, असे सांगितले.निविदा अंतिम करण्याची प्रक्रिया चालू असतानाच शासनाने टँकरचे दर वाढविले. त्यामुळे नगरच्या जिल्हाधिकाºयांनी त्यांच्या अधिकारांचा वापर करत जुन्याच निविदा वाढीव दराने मंजूर केल्या.- गणेश पवार, अप्पर सचिव,पाणी पुरवठा व स्वच्छता विभागजुन्याच निविदा जरी मंजूर केल्या असतील तरी त्या शासनाच्या नवीन दरांपेक्षा कमी दराच्या आहेत. त्यामुळे यात नियमभंग काहीही नाही.- राहुल द्विवेदी, जिल्हाधिकारी, अहमदनगर.

टॅग्स :droughtदुष्काळ