अहमदनगर : निवडणूक निकालानंतर भाजपचे उमेदवार डॉ़ सुजय विखे यांनी, ज्यांनी मला भाजपमध्ये जाण्याचा शुभसंदेश दिला, त्यांचे विशेष आभार, अशा शब्दात राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यासह विरोधकांवर टीका केली़ तसेच त्यांनी हा विजय मतदारसंघातील गोरगरीब जनतेचा असून, हा विजय आजोबांना श्रध्दांजली म्हणून अर्पण करतो, अशी प्रतिक्रिया ‘लोकमत’शी बोलताना दिली़ही निवडणूक जिंकून तुम्ही १९९१ पुनरावृत्ती केली ?उत्तर- सन १९९१ मध्ये त्यांनी आमचा पराभव केला होता़ त्याची या निवडणुकीत विजय मिळवून परतफेड केली़ नगरच्या जनतेने माझा हट्ट पुरविलेला आहे़ त्यामुळे मला माझा हट्ट पुरविण्यासाठी कुठल्या आजोबाची गरज नाही़विजयाचे श्रेय तुम्ही कुणाला देता ?उत्तर- विजयाचे श्रेय या मतदारसंघातील गोरगरीब जनतेला आहे़ या मतदारसंघातील स्वच्छतेचे काम करणारा कामगार, फिटर, महापालिकेचा कर्मचारी आणि सर्वसामान्य माणसाला असून, त्यानंतर सेना-भाजपाचे जिल्ह्यातील नेते, कार्यकर्ते आणि मुख्यमंत्र्यांना जाते़ या जिल्ह्यातील मतदार सूज्ञ आहे, त्यांनीच आपल्यावर मोठा विश्वास दाखविला आहे़ तो सार्थ करून दाखविणाऱ या जिल्ह्यातील जनतेला खऱ्या अर्थाने सुखाचे दिवस आले आहेत़तुमचा पराभव करू म्हणणाऱ्यांबाबत काय सांगाल ?उत्तर- राधाकृष्ण विखे काँग्रेसमधून गेल्याने काही फरक पडणार नाही, असे म्हणणाºयांचे राज्यात काय झाले, हे सर्व राज्याने पाहिले आहे़ भाजपमध्ये जाण्याचा शुभसंदेश ज्यांनी दिला, त्यांचे विशेष आभार मानतो़ कारण त्यांच्यामुळेच मी भाजपमध्ये आहे़
अहमदनगर लोकसभा निवडणूक निकाल 2019: माझा हट्ट पुरविण्यासाठी नगर सक्षम : डॉ.सुजय विखे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 24, 2019 3:45 PM