अहमदनगर - महानगरपालिकेच्या डिसेंबर महिन्यात होणाऱ्या निवडणुकीसाठी १७ प्रभागातील ६८ जागांसाठी शुक्रवारी (२४ ऑगस्ट) आरक्षणासह प्रारुप प्रभागरचना जाहीर करण्यात आली. प्रभागांचे भाग नकाशेही मनपात प्रसिद्ध करण्यात आले आहेत. प्रारुप प्रभाग रचना करतानाच अनुसूचित जाती व जमातीच्या जागा राखीव ठेवण्यात आल्या होत्या. त्याला निवडणूक आयोगाची मान्यता मिळाल्यानंतर प्रभारी आयुक्त राहुल द्विवेदी यांच्या उपस्थितीत नागरिकांचा मागास प्रवर्ग व महिला आरक्षणाची सोडत काढण्यात आली.
निवडणूक आयोगाच्या मान्यतेनुसार एकूण ६८ जागांचे आरक्षण जाहीर करण्यात आले आहे. यात अनुसूचित जाती ९ जागा, अनुसूचित जमाती १ जागा, नागरिकांचा मागास प्रवर्ग ओबीसी १८ जागा अशा २८ जागा आरक्षित करण्यात आल्या आहेत. त्यातील अनुसूचित जातीच्या ५ व ओबीसीच्या ९ अशा १४ जागा महिलांसाठी आरक्षित आहेत. तर सर्वसाधारण प्रवर्गातील ४० जागांपैकी २० जागा महिलांसाठी राखीव आहेत.
दरम्यान, प्रभागांच्या चतु:सिमा व परिसर असलेले नकाशे आज प्रसिध्द करण्यात आले. आरक्षणासह प्रारुप प्रभागरचनेचा आराखडा २७ ऑगस्ट रोजी राजपत्रात प्रसिद्ध करण्यात येणार आहे. त्यानंतर ५ सप्टेंबर पर्यंत हरकती घेता येणार आहेत. प्रभागाची रचना जाहीर झाल्यामुळे इच्छुकांची धावपळ सुरु झाली आहे.
प्रभागनिहाय आरक्षण पुढीलप्रमाणे
महापालिका निवडणूक २०१८
प्रभाग १ अ - अनुसूचित जाती प्रभाग १ ब - नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला प्रभाग १ क - सर्वसाधारण महिलाप्रभाग १ ड - सर्वसाधारण
प्रभाग २ अ - नागरिकांचा मागास प्रवर्ग प्रभाग २ ब - सर्वसाधारण महिला प्रभाग २ क - सर्वसाधारण महिला प्रभाग २ ड - सर्वसाधारण
प्रभाग ३ अ - नागरिकांचा मागास प्रवर्ग प्रभाग ३ ब - सर्वसाधारण महिलाप्रभाग ३ क - सर्वसाधारण महिलाप्रभाग ३ ड - सर्वसाधारण
प्रभाग ४ अ - नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला प्रभाग ४ ब - सर्वसाधारण महिलाप्रभाग ४ क - सर्वसाधारणप्रभाग ४ ड - सर्वसाधारण
प्रभाग ५ अ - नागरिकांचा मागास प्रवर्ग प्रभाग ५ ब - नागरिकांचा मागास प्रवर्ग महिलाप्रभाग ५ क - सर्वसाधारण महिलाप्रभाग ५ ड - सर्वसाधारण
प्रभाग ६ अ - अनुसूचित जमाती महिला प्रभाग ६ ब - नागरिकांचा मागास प्रवर्ग प्रभाग ६ क - सर्वसाधारण महिलाप्रभाग ६ ड - सर्वसाधारण
प्रभाग ७ अ - अनुसूचित जाती महिलाप्रभाग ७ ब - नागरिकांचा मागास प्रवर्ग प्रभाग ७ क - सर्वसाधारण महिला प्रभाग ७ ड - सर्वसाधारण
प्रभाग ८ अ - अनुसूचित जाती महिलाप्रभाग ८ ब - नागरिकांचा मागास प्रवर्ग महिलाप्रभाग ८ क - सर्वसाधारणप्रभाग ८ ड - सर्वसाधारण
प्रभाग ९ अ - अनुसूचित जाती महिला प्रभाग ९ ब - नागरिकांचा मागास प्रवर्ग महिलाप्रभाग ९ क - सर्वसाधारणप्रभाग ९ ड - सर्वसाधारण
प्रभाग १० अ - अनुसूचित जातीप्रभाग १० ब - नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला प्रभाग १० क - सर्वसाधारण महिलाप्रभाग १० ड - सर्वसाधारण
प्रभाग ११ अ - अनुसूचित जाती महिला प्रभाग ११ ब - नागरिकांचा मागास प्रवर्ग प्रभाग ११ क - सर्वसाधारण महिलाप्रभाग ११ ड - सर्वसाधारण
प्रभाग १२ अ - नागरिकांचा मागास प्रवर्ग प्रभाग १२ ब - सर्वसाधारण महिलाप्रभाग १२ क - सर्वसाधारण महिलाप्रभाग १२ ड - सर्वसाधारण
प्रभाग १३ अ - नागरिकांचा मागास प्रवर्ग प्रभाग १३ ब - सर्वसाधारण महिलाप्रभाग १३ क - सर्वसाधारण महिलाप्रभाग १३ ड - सर्वसाधारण
प्रभाग १४ अ - नागरिकांचा मागास प्रवर्ग प्रभाग १४ ब - सर्वसाधारण महिलाप्रभाग १४ क - सर्वसाधारण महिलाप्रभाग १४ ड - सर्वसाधारण
प्रभाग १५ अ - अनुसूचित जातीप्रभाग १५ ब - नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला प्रभाग १५ क - सर्वसाधारण महिलाप्रभाग १५ ड - सर्वसाधारण
प्रभाग १६ अ - अनुसूचित जाती महिला प्रभाग १६ ब - नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला प्रभाग १६ क - सर्वसाधारणप्रभाग १६ ड - सर्वसाधारण
प्रभाग १७ अ - अनुसूचित जातीप्रभाग १७ ब - नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला प्रभाग १७ क - सर्वसाधारण महिलाप्रभाग १७ ड - सर्वसाधारण