शहरं
Join us  
Trending Stories
1
उबाठा म्हणजे युज ॲण्ड थ्रो पार्टी, त्यांचा जीव मुंबई महानगरपालिकेच्या तिजोरीत; एकनाथ शिंदे यांची टीका
2
Pahalgam Terror Attack: कलमा पढायला सांगितलं, पँट काढली अन्...! पहलगाममध्ये दहशतवाद्यांचा उन्माद; धर्म विचारून २७ जणांची हत्या
3
हा देशाच्या एकता व अखंडतेवर हल्ला, पहलगाम हल्ल्याचा संघाकडून निषेध
4
हॉस्टेलच्या रूममध्येच 'ती'ने संपविले जीवन; सोलापुरातील धक्कादायक घटना
5
KL राहुलचं एकमद कूल सेलिब्रेशन! मग संजीव गोयंका यांच्या हातात हात दिला; पण... (VIDEO)
6
लग्नानंतर सातव्या दिवशीच नौदलाच्या अधिकाऱ्याची दहशतवाद्यांकडून हत्या; हनिमूनसाठी गेले होते विनय नरवाल
7
अमरनाथ यात्रेपूर्वी जम्मू-काश्मीरमध्ये मोठा दहशतवादी हल्ला; TRF च्या टेरर मॉड्यूलने चिंता वाढली
8
चोरीच्या आरोपातून दोन तरूणांना बैलबंडीला जुंपले; व्हीडिओ व्हायरल, १० जणांवर गुन्हा दाखल
9
IPL 2025 LSG vs DC : लखनौच्या संघासमोर केएल राहुलचा रुबाब; सिक्सर मारत संपवली मॅच
10
पहलगाम मध्ये तुमच्या ओळखीचे कुणी अडकले असेल तर 'या' तीन क्रमांकावर साधू शकता संपर्क
11
Rishabh Pant : पंतनं हिंमत दाखवली नाही की, तो किंमत शून्य झालाय? एक निर्णय अन् अनेक प्रश्न
12
महाराष्ट्रातल्या दोन पर्यटकांचा पहलगाम हल्ल्यात मृत्यू; पर्यटक जखमी असल्याची CM फडणवीसांची माहिती
13
"तुला मारणार नाही, जा आणि मोदींना सांग"; पतीची डोळ्यांसमोर हत्या केल्यानंतर दहशतवाद्यांनी पत्नीला धमकावलं
14
दररोज फक्त ₹7 ची बचत करा अन् दरमहा ₹5000 मिळवा; जाणून घ्या सरकारी योजनेचे फायदे...
15
जम्मू-काश्मीरमध्ये मोठा दहशतवादी हल्ला; नाव विचारुन झाडल्या गोळ्या, 27 जणांच्या मृत्यूची भीती
16
मराठी मुलीच्या वडिलांना, काकांना दहशतवाद्यांनी नाव विचारून डोळ्यांदेखत गोळ्या घातल्या- एकनाथ शिंदे
17
"सरकारला धन्यवाद, पण पुन्हा एकदा सांगतो..."; हिंदी सक्तीच्या माघारीनंतर राज ठाकरेंचे ट्विट
18
पहलगाममध्ये टीआरएफने घडवला नरसंहार; दहशतवादी संघटनेने पत्र जारी करुन सांगितले कारण
19
'दोषींना सोडणार नाही, कठोर शिक्षा...', पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर PM मोदींची तीव्र प्रतिक्रिया
20
‘यूपीएससी’त प्रज्ञाचक्षू विद्यार्थ्यांमध्ये मनू गर्ग देशात अव्वल

Ahmednagar Municipal Election : महापौर पदाचा घोडेबाजार पुन्हा रंगणार ?

By नवनाथ कराडे | Updated: December 10, 2018 15:21 IST

नवनाथ खराडे अहमदनगर : सध्याचे कल पाहता नगर महापालिकेत त्रिशंकू स्थिती दिसत आहे. महापालिका त्रिशंकू झाल्यास महापौर पदासाठी घोडेबाजाराची ...

नवनाथ खराडेअहमदनगर : सध्याचे कल पाहता नगर महापालिकेत त्रिशंकू स्थिती दिसत आहे. महापालिका त्रिशंकू झाल्यास महापौर पदासाठी घोडेबाजाराची परंपरा कायम राहणार असल्याचे चित्र दिसत आहे. अहमदनगरला महानगरपालिका स्थापन झाल्यापासून ही परंपरा कायमच आहे. नगरकरांनी कोणत्याही पक्षाला स्पष्ट बहुमत दिलेले नाही.२००३ मध्ये स्थापन झालेल्या नगर महापालिकेच्या चौथ्या सार्वत्रिक निवडणुकीचे कल हाती येत आहेत. ३० जून २००३ रोजी नगर महापालिका अस्तित्वात आल्यानंतर त्याचवर्षी डिसेंबरला पहिली निवडणूक झाली. या निवडणकीमध्ये सर्वाधिक जागा शिवसेना-भाजप युतीने जिंकल्या होत्या. पहिल्या अडीच वर्षांच्या कालावधीसाठी शिवसेनेचे भगवान फुलसौंदर यांना पहिला महापौर होण्याचा मान मिळाला. त्यानंतर सत्ताधारी गटात फाटाफूट झाल्याने या पंचवार्षिकमधील दुसरे महापौरपद काँग्रेसने मिळवले. यावेळी संदीप कोतकर महापौर बनले. २००८ मध्ये झालेल्या दुसऱ्या निवडणुकीतही शिवसेना- भाजप युती बहुमताच्या जवळ पोचली होती. या निवडणुकीमध्ये शिवसेनेला १८, भाजपला १२, काँग्रेसला ९, राष्ट्रवादी १४, मनसे २ तर अपक्ष २ व इतरांना दोन जागा मिळाल्या. पण पुन्हा फोडाफोडी होऊन राष्ट्रवादीचे संग्राम जगताप महापौर झाले. मात्र, झालेली फोडाफोडी जुळवून या पंचवार्षिकचे दुसरे महापौरपद शिवसेनेने पुन्हा मिळवले. शिला शिंदे या महापौर झाल्या. २०१३ मध्ये झालेल्या तिसºया सार्वत्रिक निवडणुकीत युती व काँग्रेस आघाडीला संमिश्र यश मिळाल्याने घोडेबाजार रंगला. शिवसेनेला १७, भाजपा ९, काँग्रेस ११ तर राष्ट्रवादीने १८ जागा मिळविल्या. मनसे ४, अपक्ष ९ अशा जागा मिळाल्या. यात राष्ट्रवादी काँग्रेसने बाजी मारून पुन्हा एकदा संग्राम जगताप महापौर झाले. त्यानंतर काही काळातच विधानसभा निवडणुकीत जगताप यांनी विजय मिळविला ्त्यामुळे राष्ट्रवादीचे अभिषेक कळमकर महापौर झाले. पण दुसºया टप्प्यात असाच घोडेबाजार युतीनेही रंगवून पुन्हा शिवसेनेने महापौरपद मिळवले. आणि सुरेखा कदम महापौर बनल्या.मागील १५ वर्षांत ७ महापौर झाले असून, त्यात शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रत्येकी तीन तर काँग्रेसचा एक महापौर झाला आहे. भाजपला अजून एकदाही हे पद भूषविता आलेले नाही. आता पार पडलेल्या निवडणुकीतही कोणत्यात पक्षाला स्पष्ट बहुमत मिळताना दिसत नाही. शिवसेना आणि भाजप यांनी ही निवडणुक स्वतंत्र लढविली होती. शहरातील अंतर्गत चौथ्या निवडणुकीत भाजपाला अपेक्षित यश मिळाले नाही. त्यामुळे भाजपाचा महापौर होण्याचे स्वप्न जवळपास मावळले आहे. त्यामुळे आता महापौरपदासाठी पुन्हा एकदा घोडेबाजार रंगण्याची चिन्हे आहेत.या घोडेबाजारमध्ये नेमका कोणता पक्ष आघाडी घेतोय याकडे राज्याचे लक्ष लागणार आहे.

टॅग्स :Ahmednagar Municipal Electionअहमदनगर महानगरपालिका निवडणूकBJPभाजपाShiv SenaशिवसेनाMNSमनसे