शहरं
Join us  
Trending Stories
1
पुणे बंगळुरू हायवेवर खासगी वाहनात सापडली कोट्यवधीची रोकड; सत्ताधारी आमदाराकडे बोट?
2
आमदार चंद्रकांत पाटलांचा CM एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीत शिवसेनेमध्ये पक्षप्रवेश
3
मविआच्या जागावाटपाची तारीख ठरली! काँग्रेसच्या बैठकीनंतर चेन्निथलांनी दिली महत्त्वाची माहिती
4
प्रेयसीची ‘दृश्यम स्टाईल’नं हत्या, मृतदेह पुरून केलं फ्लोअरिंग; आरोपीला अटक
5
बॉलिवूडचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी मुंबईत आली, आता आमदारकीचे वेध; कोण आहे 'ही' अभिनेत्री?
6
उमेदवार बदला नाहीतर जागा लढवा; देवगिरी बंगल्यात NCP कार्यकर्ते जमले, काय आहे वाद?
7
सरकार आल्यानंतर लाडक्या बहिणींना दोन हजार रुपये देणार; CM एकनाथ शिंदेंचं आश्वासन
8
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :अजितदादांनी १५ नेत्यांना दिले एबी फॉर्म; कोणत्या आमदारांना मिळाली संधी? वाचा...
9
भारत-कॅनडा वादावर जयशंकर यांनी मौन सोडले, उच्चायुक्तांना परत बोलवण्याचे कारण सांगितले
10
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : "त्यांना तिकडे उभे राहायचे असेल तर मी..."; संदीप नाईकांचे बंडखोरीचे संकेत, गणेश नाईकांनी दिली प्रतिक्रिया
11
विले पार्लेत महायुतीची डोकेदुखी वाढली! शिवसेना नेते दीपक सावंत लढणार अपक्ष
12
ICC ने निवडला वर्ल्ड कपमधील 'बेस्ट संघ', एकमेव भारतीय खेळाडूला संधी; फायनलिस्टचा दबदबा
13
"सकाळी ८ वाजता फोन आला तसं ५०० जण मुंबईला सोबत आले.."; हिरामण खोसकर काय म्हणाले?
14
Maharashtra Vidhan Sabha 2024: साताऱ्यात भाजपाची आघाडी, मविआचं ठरेना; कोण दिग्गज असणार?
15
विधानसभेसाठी वंचितची पाचवी यादी जाहीर; बारामतीतून कोणाला दिली उमेदवारी?
16
आचारसंहिता लागल्यापासून राज्यात आतापर्यंत तब्बल 'इतक्या' कोटी रुपयांची बेकायदा मालमत्ता जप्त! 
17
शिंदेंसोबतचे 'ते' २-३ नेते परतण्याच्या मनस्थितीत पण...; आदित्य ठाकरेंचा गौप्यस्फोट
18
Salman Khan : सलमान खानला धमकी देणाऱ्या व्यक्तीने आता मागितली माफी, म्हणाला...
19
MNS Candidate: राज ठाकरेंनी राजू पाटलांसह दोन उमेदवारांच्या नावाची केली घोषणा
20
जरांगे फॅक्टरला उत्तर, भाजपचा प्लान ठरला; मराठवाड्यातील १६ पैकी किती ठिकाणी मराठा उमेदवार दिले?

अहमदनगर: केडगावातील हॉटेलवर दगडफेक, पुणे महामार्गावर रास्ता रोको

By ऑनलाइन लोकमत | Published: February 14, 2023 11:55 PM

दोन गटांतील वाद : लग्नातील वादाचे पडसाद केडगावमध्ये

अहमदनगर: औरंगाबाद रोडवरील एका राजकीय नेत्यांच्या मुलाच्या लग्नसमारंभात झालेल्या वादाचे पडसाद केडगावमध्ये उमटले. मंगळवारी रात्री एका हॉटेलवर दगडफेक केल्याने दुसऱ्या गटाने पुणे महामार्गावर ठाण मांडत कारवाईची मागणी केली. दरम्यान, कोतवाली पोलिसांचा मोठा फौजफाटा केडगावात पोहोचला असून, याबाबत रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.भाजपचे माजी आमदार शिवाजीराव कर्डिले यांचे चिरंजीव अक्षय व शिवसेनेचे शहरप्रमुख (बाळासाहेबांची शिवसेना) दिलीप सातपुते यांचे चिरंजीव ओमकार यांच्यासह त्यांच्या समर्थकांमध्ये एका लग्नसमारंभात सायंकाळी साडेचार वाजेच्या सुमारास वाद झाला होता. त्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून पोलिसांनी केडगाव येथे मोठा बंदोबस्त तैनात केला होता. पोलीस बंदोबस्त असतानाही मोटारसायकलवरून आलेल्या ८ ते १० जणांनी केडगाव येथील शहरप्रमुख दिलीप सातपुते यांच्या हॉटेलवर दगडफेक केली. या दगडफेकीत काही वाहनांच्या काचा फुटल्या. त्यामुळे दुसऱ्या गटाने दगडफेक करणाऱ्यांवर तत्काळ कारवाई करावी, या मागणीसाठी पुणे महामार्गावर ठिय्या मांडला.

दरम्यान, अप्पर पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे यांच्यासह कोतवाली पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संपत शिंदे हेही घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी आंदोलनकर्त्यांशी चर्चा करत फिर्याद दाखल करण्याची प्रक्रिया ऑनलाईन आहे. त्यामुळे जागेवरच फिर्याद घेता येणार नाही. त्यासाठी पोलीस ठाण्यात यावे लागेल, अशी माहिती दिली. पोलिसांशी झालेल्या चर्चेनुसार ओमकार सातपुते यांच्यासह कार्यकर्ते रात्री अकरा वाजेच्या सुमारास पोलीस ठाण्यात दाखल होण्यासाठी केडगाव ते कोतवाली पोलीस ठाण्यापर्यंत पायी आले. पोलीस ठाण्यात रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.

टॅग्स :Ahmednagarअहमदनगर