अहमदनगर - पुणतांबा येथील ग्रामपंचायत कार्यालयासमोर सुरु असलेले निवृत्त कर्मचाऱ्यांनी उपोषण पाचव्या दिवशी मागे घेतले. गावचे सरपंच व ग्रामपंचायत सदस्य, उपोषणकर्ते यांच्यात काही मुद्द्यावर एकमत झाले.
पुणतांबा ग्रुप ग्रामपंचायतचे निवृत्त कर्मचारी प्रभाकर शेंडगे, भरत शेरकर, लक्ष्मण वडने, भोलानाथ थोरात यांनी कामगार दिनाच्या दिवशी थकीत ग्रॅज्युइटी (उपदान)रकम मिळावी यासाठी मागण्या मान्य होईपर्यंत बेमुदत उपोषणास बसले होते. या कर्मचाऱ्यांनी उपोषणाचा मार्ग सोडावा यासाठी ग्रामविस्तार अधिकारी सुनील माळी यांची दोन वेळेस केलेली शिष्टई अयशस्वी झाली.
गटविकास अधिकरी जालिंदर पठाडे यांनी तिसऱ्या दिवशी उपोषण स्थळी भेट देत कायद्याच्या निकष नुसार रक्कम मिळेल, तसेच ग्रामपंचायत वसुली झाल्याशिवाय रक्कम देता येणार नाही. ती रक्कम ६५ % राहील असे सांगितल्याने त्यादिवशी तोडगा निघाला नाही. आज ग्रामपंचायत कार्यालयात ग्रामविकास अधिकरी प्रमोद कानडे, सरपंच डॉ. धनंजय धनवटे उपसरपंच संदीप धनवटे, सदस्य कामगार नेते सुभाष कुलकर्णी, भाजप जिल्हा सरचिटणीस सुभाष वहाडणे, सदाशिव वहाटोळे, राष्ट्रवादीचे अल्पसंख्यांक आयोग सचिव छगन जोगदंड यांच्या समवेत उपोषणकर्त्या बरोबर थकीत रक्कमेत ६५% रक्कम ग्रामपंचायत देईल. न्याय प्रविष्ट बाबी कर्मचाऱ्यांनी मागे घ्याव्यात अशी चर्चा झाली. ती उपोषणकर्ते यांनी मान्य केली. सरपंच डॉ.धनंजय धनवटे, ग्रामविकास अधिकारी प्रमोद कानडे यांच्या हस्ते फळांचा रस घेऊन उपोषण सोडण्यात आले.