जामखेड : जागतिक एच.आय.व्ही./एड्स सप्ताहानिमित्त स्नेहालय स्नेहसक्षम प्रकल्प, दिशा एकात्मिक समुपदेशन, तपासणी केंद्र आणि राष्ट्रीय छात्र सेना युनिट यांच्या संयुक्त विद्यमाने ग्रामीण रुग्णालय येथे एच.आय.व्ही./एड्स व स्वच्छ भारत अभियान कार्यक्रम पार पडला.
यावेळी मंचावर तालुका आरोग्य अधिकारी डॉ. सुनील बोराडे, वैद्यकीय अधीक्षक डॉ. संजय वाघ, आय.सी.टी.सी.चे श्याम जाधवर, स्नेहालय समन्वयक योगेश अब्दुले, जैन कॉन्फरन्स राष्ट्रीय कार्यकारिणी सदस्य संजय कोठारी, जामखेड महाविद्यालयाचे प्राचार्य अविनाश फलके, नागेश विद्यालयाचे प्राचार्य हरिभाऊ ढवळे, प्रा. मधुकर राळेभात, प्रा. अरुण अडसूळ, प्रा. जयंत गायकवाड, स्नेहज्योतचे क्षेत्रीय अधिकारी मझहर खान, पल्लवी माने आदी प्रमुख उपस्थित होते.
यावेळी एन.सी.सी.चे विभागप्रमुख प्रा. संजय केळकर, प्रा. सुभाष देडे, प्रा. भोसले, प्रा. सुपेकर, प्रा. नावगिरे, टीबी विभागाचे अरुण घुंगरट, खाडे आदी उपस्थित होते.