प्रमोद आहेरशिर्डी : वीस वर्षांपूर्वी उभारलेल्या ध्यान मंदिराचा वापर गोडाऊन व सीसीटीव्हीचा नियंत्रण कक्ष म्हणून होत आहे. संस्थान अभिषेक हॉलचे रूपांतर ध्यान मंदिरात करत आहे़ या प्रकल्पाचा शुभारंभ संस्थानचे अध्यक्ष डॉ़ सुरेश हावरे यांच्या हस्ते गुरुवारी करण्यात आला़चाळीस लाख रूपये खर्चून सध्याच्या अभिषेक हॉलचे रूपांतर ध्यान मंदिरात केले जात आहे़ ध्यानमंदिर वातानुकूलित व साउंडप्रुफ असेल़ यात एकाचवेळी सव्वाशे भाविक ध्यान करू शकतील़ लवकरच काम पूर्ण होईल, असे डॉ़ हावरे म्हणाले. यावेळी विश्वस्त मोहन जयकर, बिपीन कोल्हे, नगराध्यक्षा योगिता शेळके, मुख्य कार्यकारी अधिकारी दीपक मुगळीकर, उपमुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र ठाकरे, मुख्यलेखाधिकारी बाबासाहेब घोरपडे, प्रशासकीय अधिकारी डॉ़ आकाश किसवे आदी उपस्थित होते.सन २००० मध्ये मंदिर परिसराचे नूतनीकरण करताना तत्कालीन अध्यक्ष द़ म़ सुकथनकर यांनी गुरूस्थान मंदिरासमोर दुमजली इमारत पाडून ध्यानमंदिर उभारले़ मात्र त्याचा कधीही वापर होऊ शकला नाही़ त्याचा सीसीटीव्हीचे नियंत्रण कक्ष म्हणून वापर होत आहे़ येथे येणाऱ्या भाविकाला धक्के न खाता त्याचे दर्शन आनंददायी कसे होईल यासाठी प्रयत्न व्हायला हवेत. भाविक ध्यानापेक्षा दर्शनाला अधिक महत्व देतो़ त्याला मंदिर परिसरात दोन क्षण विसावता येईल. मंदिर परिसरात कोठूनही स्क्रिनवर त्याला बाबांचा चेहरा दिसत राहील. इतकी माफक अपेक्षा भाविकांची असल्याचे माजी मंदिर प्रमुख प्रकाश खोत यांनी सांगितले.सध्याच्या अभिषेक हॉलमध्ये व्हीआयपी पासेसधारकांसाठी प्रतीक्षा कक्ष, विविध कार्यक्रम व भाविकांना बसण्यासाठी वापर होत असे़ अभिषेकासाठी पर्यायी जागा नसल्याने ध्यानमंदिरातच अभिषेक करावे लागतील. याशिवाय हे सर्व बदल करताना संस्थानने नगरपंचायतीची परवानगी घेतली नसल्याचे समजते.च्संस्थानने दोनशे रूमच्या भक्तनिवासात रूग्णालय, साईआश्रम धर्मशाळेत महाविद्यालय, ग्रंथ व फोटो विक्री विभागात रक्तपेढीचे काम, पूर्वीच्या ध्यानमंदिरात नियंत्रण कक्ष, प्रशासकीय इमारतीत दर्शनबारी, ऐतिहासिक शामसुंदर हॉलमध्ये सरपण व गोवºयासाठी गोडाऊन असे अभिनव बदल केले़ अभिषेक हॉलमध्ये ध्यानमंदिर करून जुनी परंपरा कायम राखली.
साईमंदिर परिसरात वातानुकूलित ध्यानमंदिर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 07, 2019 6:02 PM