नगरच्या नेत्यांच्या आधी अजित पवार, अण्णा हजारे गोळीबारात जखमी झालेल्या शेतक-यांच्या भेटीला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 16, 2017 12:30 PM2017-11-16T12:30:17+5:302017-11-16T12:31:26+5:30

दुपारपर्यंत जिल्ह्यातील स्थानिक नेते गोळीबारात जखमी झालेल्या शेतक-यांकडे फिरकले नाहीत. पालकमंत्री राम शिंदे, खासदार दिलीप गांधी यांच्यासह भाजपचा कोणताही नेता शेतकऱ्यांच्या भेटीला गेला नाही. 

Before Ajit Pawar, Anna Hazare falsely injured | नगरच्या नेत्यांच्या आधी अजित पवार, अण्णा हजारे गोळीबारात जखमी झालेल्या शेतक-यांच्या भेटीला

नगरच्या नेत्यांच्या आधी अजित पवार, अण्णा हजारे गोळीबारात जखमी झालेल्या शेतक-यांच्या भेटीला

अहमदनगर : शेवगाव येथे पोलिसांच्या गोळीबारात जखमी झालेल्या शेतक-यांकडे नगर जिल्ह्यातील एकही नेता फिरकला नसताना अजित पवार यांनी गुरूवारी सकाळीच नगर येथे जखमी शेतक-यांची रूग्णालयात भेट घेत विचारपूस केली. अण्णा हजारे यांनीही जखमी शेतक-यांची भेट घेतली. दुपारपर्यंत जिल्ह्यातील स्थानिक नेते या जखमींकडे फिरकले नाहीत. पालकमंत्री राम शिंदे, खासदार दिलीप गांधी यांच्यासह भाजपचा कोणताही नेता शेतकऱ्यांच्या भेटीला गेला नाही. 
नगर हा सहकारी साखर कारखानदारांचा जिल्हा आहे. जिल्ह्यात एकूण २३ सहकारी व खासगी कारखाने आहेत. ऊस दराबाबत सर्व साखर कारखानदार एकमेकांची काळजी घेत असतात. त्यामुळेच ऊस उत्पादकांच्या आंदोलनापासून सर्व नेते सोयीस्करपणे दूर असतात. बुधवारी शेवगाव तालुक्यातील गंगामाई साखर कारखान्यावर शेतक-यांचे आंदोलन सुरू असताना हिंसक वळण लागून पोलिसांना शेतक-यांवर लाठीमार करावा लागला. यावेळी झालेल्या गोळीबारात दोन शेतकरी जखमी झाले आहेत.
या आंदोलनाबाबत राधाकृष्ण विखे यांनी बुधवारी सरकारच्या निषेधाची प्रतिक्रिया माध्यमांना पाठवून दिली. मात्र, त्यांच्यासह त्यांच्या परिवारातील, तसेच काँग्रेस पक्षातील कोणीही आंदोलकांकडे फिरकले नाही. गुरूवारी दुपारी विखे जखमींना भेट देणार असल्याचे त्यांच्या कार्यालयाकडून कळविण्यात आले आहे. राष्ट्रवादीचे स्थानिक नेतेही या घटनेबाबत मौन बाळगून आहेत. सत्ताधारी आणि विरोधी पक्षाच्या जिल्हाध्यक्षांनी अद्यापपर्यंत याप्रकरणी आपल्या प्रतिक्रियाही दिलेल्या नाहीत. राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष चंद्रशेखर घुले यांच्या तालुक्यात हा प्रकार घडूनही ते शेतक-यांच्या भेटीला गेले नाहीत. या सर्व पार्श्वभूमीवर अजित पवार हे काहीही कल्पना न देता गुरूवारी सकाळी साडेसात वाजताच नगरला रूग्णालयात पोहोचून जखमी शेतक-यांना भेटले. तसेच त्यांनी शेवगाव तालुक्यातील घोटण, खानापूर येथे भेट देऊन शेतक-यांशी संवाद साधला. यावेळी त्यांच्यासमवेत नगरचे आमदार संग्राम जगताप होते. या घटनेबाबत हिवाळी अधिवेशनात आवाज उठविणार असल्याचे पवार यावेळी म्हणाले. या प्रकरणाची चौकशी होऊन दोषींवर कारवाई करण्याची मागणी त्यांनी केली.

Web Title: Before Ajit Pawar, Anna Hazare falsely injured

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.