अहमदनगर : जिल्हा बँकेच्या रिक्त झालेल्या अध्यक्ष पदाच्या निवडणुकीबाबत विरोधी पक्ष नेते अजित पवार यांनी काल महाविकास आघाडीच्या सर्व संचालकांची बैठक घेतली. या बैठकीला भाजपच्या संचालकांना बोलविले नाही ही बाब आम्ही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निदर्शनास आणून दिली. त्यानंतर त्यांनी निवडणुकीमध्ये कोणत्या परिस्थितीत सक्रीय होण्याचे आदेश दिले. त्यानुसार आम्ही शिवाजीराव कर्डिले यांचा उमेदवारी अर्ज दाखल करून ही निवडणूक जिंकली आहे, असा आरोप खासदार सुचे विखे यांनी केला आहे.
जिल्हा बँकेच्या अध्यक्षपदी शिवाजीराव कर्डिले
अहमदनगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या अध्यक्षपदासाठी बुधवारी झालेल्या निवडणुकीत माजी आमदार शिवाजीराव कर्डिले यांना दहा तर माजी आमदार चंद्रशेखर घुले पाटील यांना नऊ मते मिळाली. अध्यक्षपदासाठी झालेल्या निवडणुकीत साठी एकूण 20 संचालक उपस्थित होते. यापैकी दहा मते कर्डिले यांना मिळाली, तर नऊ मते घुले यांच्या पारड्यात पडली. एक मत बाद झाले असून निवडणूक निर्णय अधिकारी जिल्हा उपनिबंधक गणेश पुरी यांनी कर्डिले यांची अध्यक्षपदी निवडणूक झाल्याचे जाहीर केले.