शेवगाव गोळीबारातील जखमी शेतक-यांची अजित पवारांनी घेतली भेट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 16, 2017 11:14 AM2017-11-16T11:14:16+5:302017-11-16T11:56:24+5:30
गुरुवारी सकाळीच राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी या जखमी शेतक-यांची भेट घेट घेतली. तसेच शेवगाव तालुक्यातील घोटण, खानापूर गावातील शेतक-यांशी संवाद साधला.
शेवगाव : आंदोलनकर्त्या शेतक-यांवर बुधवारी (दि़ १५) पोलिसांकडून गोळीबार करण्यात आला. यात जखमी झालेल्या शेतक-यांवर नगरमध्ये उपचार सुरु आहेत. गुरुवारी सकाळीच राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी या जखमी शेतक-यांची भेट घेट घेतली. तसेच शेवगाव तालुक्यातील घोटण, खानापूर गावातील शेतक-यांशी संवाद साधला.
गुरुवारी (दि़ १६) सकाळी ७.३० वाजता माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी नगरमध्ये जखमी शेतक-यांची दवाखान्यात जाऊन भेट घेतली. तसेच त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली. यावेळी आमदार संग्रामभैय्या जगताप, राष्ट्रवादी काँग्रेस युवक प्रदेश उपाध्यक्ष कुमारभाऊ वाकळे, गटनेते संपतदादा बारस्कर, माजी नगरसेवक संजुभाऊ झिंजे आदी उपस्थित होते. बुधवारी दिवसभर धुमसत असलेल्या आंदोलनाचे केंद्रबिंदू ठरलेल्या घोटण, खानापूर गावातील शेतक-यांशीही अजित पवार यांनी गुरुवारी सकाळी ९.३० वाजता संवाद साधला. घोटण येथे बोलताना ते म्हणाले, हिवाळी अधिवेशनात याबाबत आवाज उठविणार असून, हे सरकार शेतकरीविरोधी असल्यामुळेच शेतक-यांवर थेट गोळीबार करण्याची ताकद पोलिसांमध्ये आली. या प्रकरणाची चौकशी होऊन दोषींवर कारवाई करावी. शेतक-यांचे प्रश्न सोडविण्यात या सरकारला पूर्णपणे अपयश आल्याचे पवार म्हणाले.