शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
2
लुटणाऱ्याचे पैसे घ्या, पण मनसेला मतदान करा; उल्हासनगरच्या सभेत राज ठाकरेंचे वक्तव्य 
3
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
4
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा
5
महायुती सत्तेत आली, तर मुख्यमंत्री कोण होणार? एकनाथ शिंदे अन् अजित दादांचं नाव घेत जयंत पाटलांची भविष्यवाणी!
6
अजित पवारांविरोधात उमेदवार देण्याचं शरद पवारांनी सांगितलं वेगळंच कारण; काय बोलले?
7
माइक टायसनचे 19 वर्षांनंतर कमबॅक, एका फाइटसाठी मिळणार तब्बल 168 कोटी रुपये
8
आता महाराष्ट्राला महिला मुख्यमंत्री मिळालेली पाहण्याची माझी इच्छा; शरद पवारांचे पुण्यात मोठे वक्तव्य
9
देवेंद्र फडणवीसांची भर पावसात सभा; म्हणाले- "पावसात सभा घेतली की सीट निवडून येतेच..!"
10
रॅडिको कंपनीत स्टोरेज टाकीचा स्फोट; शेकडो टन मक्याखाली कामगार दबले, चौघांचा मृत्यू
11
पाकिस्तानला मोठा धक्का! चॅम्पियन्स ट्रॉफी घेऊन PoKमध्ये जायचं नाही, ICCने PCBला ठणकावलं!
12
देव तारी त्याला कोण मारी! चालत्या ट्रेनमधून पडलेल्या प्रवाशाचा आरपीएफ जवानाने वाचवला जीव
13
Raj Thackeray: राज ठाकरे भाषण न करताच भिवंडीतून परतले; प्रकृती अस्वास्थ्यामुळे घेतला निर्णय
14
ट्रम्प विजयाबरोबरच सोन्याचे 'अच्छे दिन' संपले, दिसून आली 3 वर्षातील सर्वात मोठी घसरण! आता खरेदी करायला हवं की नको?
15
'चूक झाली, यापुढे इकडे-तिकडे जाणार नाही', सीएम नितीश कुमारांचा पीएम मोदींना शब्द
16
शशांक केतकर आणि मृणाल दुसानिस तब्बल ४ वर्षांनंतर पुन्हा एकत्र, त्यांची गाजलेली ही मालिका पुन्हा भेटीला
17
Maharashtra Election 2024: राहुल गांधींच्या महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी तीन घोषणा!
18
जाना था जापान, पहुंच गए चीन...! पंकजा मुंडेंसोबत असेच घडले, हेलिकॉप्टर सिडकोऐवजी सायखेड्याला पोहोचले
19
दोन 'गुलाब'रावांच्या हायव्होल्टेज लढतीत विजयाचा 'गुलाल' कोण उडवणार?
20
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्लेनमध्ये तांत्रिक बिघाड, देवघर एअरपोर्टवर थांबलं विमान

अकोलेत गड, धबधबे, गुहा आजही पर्यटकांचे आकर्षण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 27, 2019 5:08 PM

अकोले तालुक्यातील शेकडो दुर्लक्षित धबधबे, गड, गुहा, जंगल, गडवाटांनी किमान दोन हजार वर्षांचा इतिहास जसाच्या तसा ठेवला आहे. गरज आहे हा अमूल्य ठेवा जगासमोर येण्याची, तसेच शासनाच्या पर्यटन विभागाने योग्य प्रसिद्धी देण्याची.

जागतिक पर्यटन दिन विशेष/ मच्छिंद्र देशमुख/  कोतूळ-अकोले तालुक्यातील निसर्ग, गड-किल्ले म्हणजे महाराष्ट्राच्या नैसर्गिक, ऐतिहासिक व सांस्कृतिक परंपरांचा राजमार्ग. आजही अकोले तालुक्यातील शेकडो दुर्लक्षित धबधबे, गड, गुहा, जंगल, गडवाटांनी किमान दोन हजार वर्षांचा इतिहास जसाच्या तसा ठेवला आहे. गरज आहे हा अमूल्य ठेवा जगासमोर येण्याची, तसेच शासनाच्या पर्यटन विभागाने योग्य प्रसिद्धी देण्याची.राज्यातील वन्यजीव व वनसंपदेसाठी हरिश्चंद्रगड व कळसूबाई अभयारण्य सर्वश्रुत आहे. कळसूबाई, भंडारदरा, रंधा ही पर्यटनस्थळे राज्यभर प्रसिद्ध झाली, ती भंडारदरा धरण व  इथल्या व्यावसायिकांनी केलेल्या जाहिरातीमुळे. तालुक्यातील मुळा नदीच्या उगमापर्यंत कोतूळ ते हरिश्चंद्रगडापर्यंत शेकडो धबधबे पर्यटकांना हाक देत आहेत. त्यात कोतूळ (पिसेवाडी) येथील कातरण्याचा तीनशे फुटांवरुन कोसळणारा धबधबा, तसेच मुकाईचा धबधबा, कोहणे परिसरातील बाळाईचा धबधबा, तर तळे, विहीर, कोथळे डोंगरावरून कोसळणारे शेकडो धबधबे पर्यटकांची वाट पाहत आहेत. तालुक्यात हरिश्चंद्रगड व कळसूबाईच्या कुशीत दोन हजार वर्षांचा मोठा इतिहास दडला आहे, तो म्हणजे तालुक्यातील अलंग, मलंग व कुलंग गड, तसेच करवली (सांधन दरी ) चेंढ्या, मेंढ्या व उंबरदरा या घाटवाटांमध्ये. सातवाहन काळातील जगातील पहिली मराठी सम्राज्ञी नागनिका हिने हे किल्ले व मार्ग बनवले. ती आंद्र (आंदर मावळ) येथील म्हणजे हल्लीचे जुन्नर येथील सम्राज्ञी होती. नाणे घाट व अकोले तालुक्यातील या मार्गांनी कलीयन (कल्याण), शुरपारक (नालासोपारा) या आंतरराष्ट्रीय बंदरांत मसाल्याचे पदार्थ, कलाकुसरीच्या वस्तुंची ने आण करण्यासाठी चेंड्या घाट (व्यापारी मार्ग) तयार केला. तर मेंढ्या (लष्करी मार्ग) होता. दोन्ही मार्ग नैसर्गिक आपत्तीने बंद झाल्यास उंबरदरा (बायपास) तयार केला. पुढे सातवाहन राजे सातकर्णी व शिवश्री यांनी हे मार्ग विकसित करून अखंड सत्ता ठेवली. आजही हे मार्ग सुस्थितीत आहेत. घाटनदेवीमार्गे मेढं (शहापूर) या ठिकाणी जायला स्थानिक आदिवासी आजही याच मार्गाने पायी जातात, तर ट्रेकर्सचे स्वप्न पूर्ण करणारे अलंग मलंग व कुलंग किल्ले कोकण व पश्चिम महाराष्ट्राचे निरीक्षक ठरले.अकोले तालुक्यातील धारेरावचे अप्रतिम जंगल,  क्रांतिवीर राघोजी भांगरे यांची बाडगीची माची, शेणीतचे भुयार (स्थानिक लोक यास हिरण्यकश्यपूची राजधानी म्हणतात) अशी कितीतरी पर्यटनस्थळे प्रसिध्दीअभावी दुर्लक्षित आहेत. अकोले तालुक्यातील इतिहास, निसर्ग व अलंग, मलंग, कुलंग हे किल्ले राज्यातील ट्रेकर्सचे स्वप्न आहे. रस्ते, निवास अशा सुविधा मिळाल्या व या ठिकाणांची माहिती पर्यटन विभागाने चित्रफितीद्वारे प्रसिद्ध केल्यास येथील पर्यटन जगाच्या नकाशावर येईल, असे सातवाहन ट्रेकर्सचे  धनंजय गाडेकर यांनी सांगितले.                       अकोले तालुक्यातील बराच इतिहास व प्रेक्षणीय स्थळे प्रसिध्दीपासून दूर आहेत. लवकरच तज्ज्ञांचे मार्गदर्शन घेऊन, माहिती संकलित करण्यासाठी प्रयत्न सुरू आहे, असे हरिश्चंद्रगडाचे वनपरिक्षेत्र अधिकारी अमोल आडे यांनी सांगितले.  

टॅग्स :environmentपर्यावरणAhmednagarअहमदनगर