पाथर्डी : शारदीय नवरात्र महोत्सवात राज्याच्या विविध भागातून आलेल्या भाविकांनी मोहटा देवीच्या दान पेटीत रोख, सोने चांदी मिळून एकूण १ कोटी २७ लाख ९२ हजार १६४ रूपयांचे दान जमा झाले आहे. देवस्थान समितीचे अध्यक्ष तथा जिल्हा न्यायाधीश अशोक भिल्लारे यांच्या मार्गदर्शनाखाली मोजणीची प्रक्रिया दोन दिवस पार पडली. श्री क्षेत्र मोहटा देवी येथे नवरात्र काळात दान पेटीत आलेल्या दानाची मोजदाद सीसीटीव्ही कॅमे-याच्या निगराणीखाली मुख्य हॉलमध्ये करण्यात आली. यावेळी पाथर्डीचे दिवाणी न्यायाधीश सुशील देशमुख ,दिवाणी न्यायाधीश अस्मिता वानखडे यांसह सर्व विश्वस्त, देवस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी, रेणुका विद्यालयाचे शिक्षक, भारतीय स्टेट बॅँकेचे कर्मचारी आदींनी मोजणी प्रक्रियेत सहभाग घेतला. यामध्ये दानपेटीत निघालेली रक्कम ८० लाख २३ हजार ७७४ रूपये, देणगी स्वरूपात रोख रक्कम ३१ लाख ५० हजार ६४३ रूपये, सोने वस्तू ९ लाख ३९ हजार ८०० रूपये, चांदी वस्तू ५ लाख ३४ हजार ३५० रूपये इतर १ लाख ४३ हजार ५९७ रूपयांचे दान भाविकांनी टाकले.
मोहटादेवीच्या दानपेटीत सव्वा कोटीचे दान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 15, 2019 2:42 PM