शहरं
Join us  
Trending Stories
1
"त्या पुढाऱ्यांचा राग माझ्यावर काढू नका"; अजित पवार ग्रामस्थांशी काय बोलले?
2
शरद पवार गटाचे उमेदवार समजीत घाटगे अंतरवालीत; मनोज जरांगेंची घेतली भेट, २ तास चर्चा
3
शिवसेना शिंदे गटाचे कार्यकर्ते काँग्रेसच्या प्रचारात; भाजपच्या बंडखोर महिला नेत्याचा मोठा दावा
4
महायुतीत बंडखोरांचा ३६ चा आकडा, त्यापैकी १९ भाजपाचे; बंड शमले नाहीतर युती-आघाडीला ५० जागांवर फटका
5
धनंजय मुंडे यांच्या २०१९ च्या शपथपत्रात तीन, तर २०२४ मध्ये पाच अपत्यांचा उल्लेख!
6
'इमर्जन्सी' ही प्रोपोगंडा फिल्म आहे का? श्रेयसने विचारलेला कंगनाला प्रश्न! अभिनेत्री म्हणाली-
7
"तू तो गया"! सिली पॉइंटवर Sarfaraz Khan चं रचिन विरुद्ध 'स्लेजिंग'; व्हिडिओ व्हायरल
8
८ नोव्हेंबरपासून 'या' कंपनीचा IPO खुला होणार; प्राईज बँड ₹२४, परदेशात आहेत कंपनीचे ग्राहक
9
“मनोज जरांगेंच्या रुपात देशाला आधुनिक गांधी, आंबेडकर, मौलाना आझाद मिळाले”; कुणी केले कौतुक?
10
कर्नाटक आर्थिक संकटात! जेवढी द्यायची ऐपत, तेवढीच आश्वासने द्या...; खर्गेंनी महाराष्ट्रावरून नेत्यांचे कान टोचले
11
नेत्रदिपक भरारी! मेडिकलचं करिअर सोडलं, काहीतरी मोठं करायचं ठरवलं; झाली अधिकारी
12
"मी ठासून सांगतोय माघार घेणार नाही"; वर्षा बंगल्यावरील भेटीनंतर सरवणकरांची स्पष्ट भूमिका
13
Maharashtra Election 2024: महाविकास आघाडीचा गेम बिघडवणार?; ११ बंडखोर कोण आहेत?
14
अमिषा पटेलनं का नाकारला होता शाहरुख खानचा 'चलते चलते'?, अभिनेत्री म्हणाली - "मला..."
15
पंतप्रधानांच्या आर्थिक सल्लागार परिषदेच्या अध्यक्षांचे निधन; मोदींकडून शोक व्यक्त
16
तरुणीचा व्हिडीओ कॉल उचलला आणि हनिट्रॅपमध्ये अडकले मंत्री, त्यानंतर घडलं असं काही...
17
Video - "RC, ड्रायव्हिंग लायसन्सची गरज नाही, पकडलं तर फक्त भाजपाची डायरी दाखवा, पोलीस..."
18
Gautam Adani News : अदानींनी नेमकं केलंय तरी काय? 'या' कंपनीच्या मागे का लागल्यात PNB, ICICI सारख्या बँका?
19
'सुंदर' चेंडू अन् 'कॉपी पेस्ट फॉर्म्युला'! टॉम लॅथमसह रचिन झाला क्लीन बोल्ड (VIDEO)
20
कार्तिक आर्यन-विद्या बालनचा 'भूल भूलैय्या ३' कसा आहे? पहिला Review आला समोर

संगमनेर बसस्थानकातून ग्रामीण वगळता इतर सर्वच फेऱ्या रद्द

By शेखर पानसरे | Published: October 31, 2023 12:40 PM

संगमनेर बसस्थानकातून प्रवाशांच्या सोईसाठी मोठ्या प्रमाणात बसेस सुटतात. लांब पल्ला, मध्यम पल्ला, ग्रामीण फेऱ्या तसेच बसेस मुक्कामी देखील जातात.

लोकमत न्यूज नेटवर्कसंगमनेर : मराठा आरक्षणासाठी राज्यभरात सुरू असलेल्या आंदोलनांच्या पार्श्वभूमीवर सतर्कतेचे आदेश देण्यात आले आहेत. महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या संगमनेर आगारातील बसेसच्या फेऱ्या रद्द करण्यात आल्या आहेत. दररोज होणाऱ्या ३९४ फेऱ्यांपैकी केवळ ग्रामीण फेऱ्या सुरू आहेत. अशी माहिती संगमनेर आगारप्रमुख प्रशांत गुंड यांनी दिली.

 संगमनेर बसस्थानकातून प्रवाशांच्या सोईसाठी मोठ्या प्रमाणात बसेस सुटतात. लांब पल्ला, मध्यम पल्ला, ग्रामीण फेऱ्या तसेच बसेस मुक्कामी देखील जातात. ग्रामीण भागातून विद्यार्थी मोठ्या संख्येने शहरातील शाळा, महाविद्यालये येथे शिक्षणासाठी येतात. ग्रामीण भागातही बसेस मुक्कामी पाठविण्यात येतात. विद्यार्थ्यांची गैरसोय टाळण्यासाठी केवळ ग्रामीण फेऱ्या सुरू आहेत. लांब पल्ला, मध्यम लांब पल्ला असलेल्या सर्वच फेऱ्या रद्द करण्यात आल्या आहेत.

मंगळवारी (दि.३१) सकाळी पुणे येथे चार, अहमदनगर येथे दोन तर मुंबई येथे एक बस सोडण्यात आली होती. नाशिक-पुणे महामार्गावर शिंदे पळसे (जि. नाशिक) येथे आंदोलन सुरू असल्याने मुंबईला आणि त्याचबरोबरच पुणे, अहमदनगर येथे जाणाऱ्या बसेस मागे बोलावून घेण्यात आल्या. वरिष्ठांचे आदेश आल्यास सुरू असलेल्या फेऱ्या रद्द होतील. असेही आगारप्रमुख गुंड यांनी सांगितले.

टॅग्स :Maratha Reservationमराठा आरक्षणstate transportएसटी