लॉकडाऊनमध्ये जीवनावश्यक वस्तू विक्री करणारे व औषध विक्रेत्यांना दुकाने सुरू करण्यास परवानगी होती. सकाळी ७ ते ११ ही दुकाने उघडण्याची वेळी होती. परंतु कापड, सलून, रेस्टॉरन्ट, हार्डवेअर, स्टेशनरी, जनरल स्टोअर्स, भांडी, सराफ, शालेय वस्तू, इलेक्ट्रॉनिक्स, फर्निचर, पादत्राणे, भाजी मंडई, मार्केट यार्ड आदी व्यापार क्षेत्रातील व्यवहार ५१ दिवसांपासून बंद आहेत.
दुकानांची घरपट्टी, घर खर्च, कर्जावरील व्याज, लाईट बिल, नोकरांचे पगार आदी व्यवहार बंद ठेवून करणे कठीण झाले आहे. दुकानातील मालही खराब होऊ लागला आहे. शासनाने लॉकडाऊन संदर्भात १ तारखेपासून बदल करताना शासनाने नियमनात बदल करून सकाळी ८ ते ४ या वेळेत सर्व दुकानाचे व्यवहार सुरू करण्यास परवानगी द्यावी, अशी मागणी श्रीरामपूर मर्चन्टस् असोसिएशनने निवेदनाद्वारे केली आहे. निवेदनावर मर्चन्टस् असोसिएशनचे अध्यक्ष विशाल पोळळे, उपाध्यक्ष उमेश अग्रवाल, सेक्रेटरी नीलेश ओझा, सहसेक्रेटरी अमोल कोलते, संचालक विलास बोरावके, संजय शाह, वैभव लोढा, राहुल मुथ्था, मुकेश कोठारी, सुनील गुप्ता, प्रवीण गुलाटी, प्रेमचंद कुंकूलोळ, दत्तात्रय धालपे, नितीन ललवाणी, राजेश कासलीवाल आदींच्या स्वाक्षरी आहेत.
--------
कोविड सेंटर केले बंद
श्रीरामपूर : श्रीरामपूर मर्चन्टस् असोसिएशन मंगल कार्यालय कार्यालयात सुरू करण्यात आलेले स्व. जयंतराव ससाणे कोविड सेंटर हे दोन दिवसांपूर्वी रुग्णांची संख्या घटल्यामुळे बंद करण्यात आले आहे. उपनगराध्यक्ष करण ससाणे यांच्या पुढाकारातून शहर कॉंग्रेस कमिटी, श्री शक्ती ग्रुप, तुळजा फाउंडेशन व मर्चन्टस् असोसिएशन यांच्या संयुक्तिक विद्यमानेे कोरोनाच्या वाढता प्रादुर्भावावर मात करण्यासाठी कोविड सेंटर सुरू करण्यात आले होेते. सेंटरमध्ये दाखल रुग्णांची जेवण, राहण्याची सोय करून उत्तम सेवा देण्यात आली. सेंटरचा समारोप समारंभ झाला. सेंटरमध्ये ९६ कोविड बाधा झालेले रुग्ण दाखल होते. त्यातील ६८ रुग्ण बरे होऊन घरी गेले. अन्य रुग्णांना अन्य हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी रेफर करण्यात आले.
--------