शिर्डी : अमिताभ बच्चन यांना सरकार भारतरत्न देवो न देवो काही फरक पडत नाही, अमिताभ हे माझ्यासाठी भारतरत्नच असल्याची भावना जया बच्चन यांनी मंगळवारी साईदरबारी व्यक्त केली.मुंबईच्या ऊर्जा फौंडेशनच्या वतीने साई मंदिरातील वीज पुरवठय़ासाठी पाच किलो वॅटची सोलर सिस्टीम देणगी स्वरूपात देण्यात आली.जया बच्चन यांच्या हस्ते ही सिस्टीम विधीवत संस्थानला अर्पण करण्यात आली. यावेळी कार्यकारी अधिकारी राजेंद्र जाधव, उपकार्यकारी अधिकारी आप्पासाहेब शिंदे, एलआयसीच्या कार्यकारी संचालक उषा सांगवान,ऊर्जाचे पराग शुक्ला, मधु कपूर,संस्थानच्या विद्युत विभागाचे प्रमुख विजय रोहमारे,जनसंपर्क अधिकारी मोहन यादव यावेळी उपस्थित होते.वीज बचतीवर परिणामकारक असलेल्या अशा प्रकल्पांचा केवळ साईमंदिरालाच नव्हे तर परिसराला लाभ व्हावा, त्यासाठीही ऊर्जाने पुढाकार घ्यावा असे आवाहन यावेळी जया यांनी केले. उद््घाटन करणे आवडत नाही, मात्र साईदर्शनाच्या संधीची आपण वाटच पाहत असतो, त्यातूनच आपण या चांगल्या सोहळ्याला उपस्थित राहिल्याचे त्यांनी सांगितले.आज बसवण्यात आलेल्या सोलर सिस्टीमची किंमत जवळपास दहा लाखांपर्यंत आहे. याद्वारे ४.५ के.डब्ल्यू. इतक्या विजेच्या वापरातून साईमंदिर रोज किमान दहा तास सौर ऊज्रेने उजळून निघणार आहे. त्यामुळे दिवसास पंचेचाळीस युनिट वीज वाचणार असून सध्याच्या दरानुसार दररोज ३४५ व वर्षाला एक लाख पंधरा हजारांची बचत होणार आहे.
अमिताभ माझ्यासाठी 'भारतरत्नच'!
By admin | Published: January 28, 2015 1:57 PM