जामखेड : तालुका पोलीस पाटील संघटना अध्यक्षपदी सर्वानुमते शिऊरचे पोलीस पाटील अमोल गायकवाड यांची बिनविरोध निवड करण्यात आली. उपाध्यक्षपदी राजुरीचे दत्तात्रय मोरे तर सचिवपदी कवडगावचे कांतीलाल भोरे यांची नियुक्ती करण्यात आली.
तालुका पोलीस पाटील यांची बैठक तहसील कार्यालयातील सभागृहात झाली.
यावेळी पोलीस पाटील योगीनाथ जायभाय, नीलेश वाघ, महादेव वराट, सिद्धेश्वर पवार, तुषार चव्हाण, निगुडे पाटील, डोंगरे पाटील जगदाळे पाटील, गव्हाणे पाटील, देशमुख पाटील, डमरे पाटील आदी उपस्थित होते.
सर्वांनी माझ्यावर विश्वास टाकला आहे, त्या विश्वासाला तडा जाऊ देणार नाही. संघटनेच्या अडीअडचणींसाठी सदैव तत्पर राहील, अशी ग्वाही गायकवाड यांनी दिली. पोलीस पाटील संघटनेच्या नूतन पदाधिकाऱ्यांच्या निवडीचे तहसीलदार विशाल नाईकवाडे, पोलीस निरीक्षक संभाजी गायकवाड, सहायक पोलीस निरीक्षक सुनील बडे, महेश जानकर, पोलीस उपनिरीक्षक राजेंद्र थोरात यांनी स्वागत केले.
--
२७ जामखेड
जामखेड येथे पोलीस पाटील संघटनेच्या नव्या पदाधिकाऱ्यांचा निवडीनंतर सन्मान करण्यात आला.