बंदच्या काळात अनेक वारकरी बाहेरुनच दर्शन घेऊन जात असत. या बंदच्या काळात आनंदाश्रम स्वामींचे वंशज दिलीप काका कुलकर्णी व प्रमुख भक्त दैनंदिन पूजा, अर्चा करीत असत. प्रत्येक महिन्यात येणाऱ्या दोन्ही एकादशीला न चुकता आनंदाश्रम स्वामींच्या दर्शनासाठी नियमित वारी करणाऱ्या वारकऱ्यांना आठ महिन्यांत एकादशीची वारी करुन दर्शन घेतल्याचा लाभ मिळाला. त्यामुळे त्यांच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहत होता. यावेळी हभप दत्तात्रय महाराज दरेकर यांचे कीर्तन झाले. वारकऱ्यांचे फराळासाठी विसापूर येथील स्वामी भक्त गणपतराव जठार व कोळगाव येथील भक्त गौरव पुरी यांनी केळींचे वाटप केले. स्वामींचे शीख धर्मिय भक्त मनमोहनसिंग कोचर, अंकुशराव रोडे, सर्जेराव रोडे, दिलीप काका कुलकर्णी, विस्वस्त पोपटराव रोडे, संस्थानचे व्यवस्थापक संतोष शिंदे व ग्रामस्थांनी दर्शन घेतले.
आनंदाश्रम स्वामीचा मठ दर्शनासाठी खुला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 14, 2020 4:33 AM