अनाम प्रेमतर्फे दिव्यांगांचा वधु-वर मेळावा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 22, 2018 2:07 PM
पंसती झाल्यास लगेच विवाह: मंगळसूत्र, शासकीय योजनांचा लाभ
अहमदनगर : स्नेहालय संचलित अनामप्रेम या संस्थेच्यावतीने महाराष्ट्रातील सर्व प्रकारच्या दिव्यांगांसाठी वधू-वर मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. २८ एप्रिल रोजी सकाळी १० ते ४ या वेळेत हा मेळावा निंबळक येथील स्नेहालयच्या ‘सत्यमेव जयते ग्राम’प्रकल्पात होणार आहे. या मेळाव्यात दिव्यांगाना मोफत प्रवेश राहील. मेळाव्यात जर एखाद्या वधू-वर याचा विवाह जुळल्यास अनामप्रेम द्वारा दुसºयाच दिवशी दि.२९ एप्रिल रोजी विवाह सोहळा आयोजित करण्यात येणार आहे. दिव्यांगांचे जीवन पुनर्वसन करण्यासाठी त्यांना त्यांच्या अपंगत्वास पूरक असा जोडीदार मिळणे आवश्यक असते. त्यासाठीच अशा दिव्यांग वधू-वर मेळाव्यातून राज्यातील दिव्यांगांचा परिचय मेळावा आणि विवाह सोहळा आयोजित करणे गरजेचे आहे. या मेळाव्यात सहभागी होऊ इच्छिणाºयांनी अपंग प्रमाणपत्र, आधार कार्ड,जन्मदाखला, रेशन कार्ड, सोबत दोन साक्षीदार, पालकांची उपस्थिती आवश्यक आहे. विवाह जुळल्यास संस्थेच्या प्रकल्पात होणाºया विवाहास संस्थेतर्फे मणी-मंगळसूत्र, शासकीय सुविधा मिळवून दिल्या जाणार आहेत. मेळाव्यात सहभागी होणाºयाांन नाव-नोंदणी करणे गरजेचे आहे. नाव-नोंदणी करिता अनामप्रेम, गांधी मैदान, स्नेहालयामागे अहमदनगर येथे दिव्यांगाची नोंदणी व्यवस्था करण्यात आली आहे. या मेळाव्यास दिव्यांगांनी उपस्थित राहण्याचे आवाहन अनामप्रेमचे अजित माने, सुभाष शिंदे, राधा मिलिंद कुलकर्णी, नाना भोरे, किशोर कुलकर्णी, विधीज्ञ अविनाश बुधवंत करीत आहेत.