जवळे : पारनेर तालुक्यातील जवळे ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी अनिता सुभाष आढाव, उपसरपंचपदी गोरख शिवाजी पठारे यांची निवड झाली.
धर्मनाथ ग्रामविकास पॅनल प्रमुख शिवाजीराव धोंडिबा सालके, सुभाष भाऊसाहेब आढाव यांच्या नेतृत्वाखाली पंधरापैकी अकरा जागी उमेदवार विजयी झाले होते. तसेच जय भवानी ग्रामविकास पॅनल प्रमुख किसनराव रासकर, उद्योजक बाळासाहेब सालके यांच्या नेतृत्वाखाली पंधरापैकी चार उमेदवार विजयी झाले होते. सरपंच, उपसरपंच निवड प्रक्रियेवेळी सरपंचपदासाठी अनिता सुभाष आढाव, अशोक ज्ञानदेव सालके यांचे अर्ज आले होते. अनिता आढाव यांना सरपंचपदासाठी ११ मते मिळाली. उपसरपंचपदासाठी गोरख शिवाजी पठारे व अनिता राजाराम लोखंडे अर्ज आले होते. यामध्ये गोरख पठारे ११ मतांनी विजयी झाले.
यावेळी शिवाजी धोंडीबा सालके, किसनराव रासक, प्रभाकर अनंथा अलभर, बेबी कैलास गवळी, कांताबाई केरू जाधव, सोनाली संदीप सालके, मनीषा कानिफनाथ पठारे, कांता काळू साळवे, मीना नंदराज शिंगाडे, उषा रायचंद आढाव, अनिता राजाराम लोखंडे, अशोक ज्ञानदेव सालके, नवनाथ रामराव सालके हे ग्रा. पं. सदस्य उपस्थित होते.
निवडणूक प्रक्रिया अधिकारी म्हणून बाळासाहेब कर्डिले, सहाय्यक निवडणूक अधिकारी म्हणून शुभम काळे, ग्रामसेवक शिवाजी खामकर यांच्या उपस्थितीत निवड प्रक्रिया पार पडली.
फोटो : ११ अनिता आढाव, ११ गोरख पठारे