शहरं
Join us  
Trending Stories
1
ऐन दिवाळीत नेते बंडोबांना थंडोबा करण्याच्या मोहिमेवर; महायुती, महाआघाडीसाठी पुढील ४ दिवस वाटाघाटीचे
2
आजचे राशीभविष्य : आज अवैध कामांपासून दूर राहावे, क्रोध आणि वाणीवर संयम ठेवावा लागेल
3
दिवाळी झटका! LPG सिलिंडरचा भाव वाढला, पटापट चेक करा दिल्ली ते मुंबईपर्यंतचे नवे दर
4
२४ तासांत १०० विमानांना बॉम्बची धमकी, एअर इंडियाच्या ३६, विस्ताराच्या ३५ फेऱ्यांवर परिणाम  
5
नेपाळी नोटेवरील नकाशात दाखवली तीन भारतीय क्षेत्रे, नोटा छापण्याचे कंत्राट दिले चिनी कंपनीला
6
मनोज जरांगेंचे ‘एमएमडी’ समीकरण; विधानसभा लढवण्याची घोषणा
7
मुंबईकरांना भुरळ लाइटवेट दागिन्यांची! धनत्रयोदशीला बाजारात २५० कोटींची उलाढाल
8
निवडणुकीतील गैरप्रकार थांबवा, अन्यथा कारवाई, मुख्य निवडणूक अधिकारी चोक्कलिंगम यांचा इशारा
9
राज्यातील बेरोजगारीवर न बोलणारे हे कसले सरकार? काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचा सवाल
10
पाकिस्तानसह जगभर दिवाळीची धूम, अमेरिकेत शाळांना सुट्टी
11
राज्यात आलेली सर्वाधिक परकीय गुंतवणूक फडणवीसांच्या नावावर
12
आयपीएल रिटेंशन : रोहित शर्मा मुंबईकडेच; माही केवळ ४ कोटींमध्ये खेळणार
13
राहुल गांधींचे महाराष्ट्रातील ‘गॅरंटी कार्ड’ही फ्लॉप होणार : देवेंद्र फडणवीस 
14
समतोल ‘मन’ हेही ‘धन’; आज त्याची पूजा करू या!
15
मध्य रेल्वेने प्रवाशांना धरले वेठीस; ४ दिवस सुटीचे वेळापत्रक लागू
16
19 मिनिटांत 22 किलोमीटरचे अंतर पार अन् मिळाले जीवदान
17
खंडणीसाठी धमकावल्याप्रकरणी छोटा राजन टोळीचे ५ जण अटकेत
18
इस्रायली महिला फायटर्सचे इराणवर हल्ले!
19
११ वर्षीय पीडितेच्या गर्भपातास परवानगी; रक्त नमुना, टिश्यू जतन करण्याचे निर्देश 
20
‘राज’ की बात, भाजप अन् शिंदेंची अडचण!

Anna Hazare Andolan : अहमदनगरमध्ये मोदी सरकारच्या प्रतिकात्मक पुतळ्याचं दहन

By ऑनलाइन लोकमत | Published: March 23, 2018 12:34 PM

ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्या नवी दिल्ली येथील सत्याग्रह आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी जाणा-या रेल्वे व बसेस सरकारने रोखल्यामुळे राळेगणसिद्धीत मोदी सरकारच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन करत ग्रामस्थांनी निषेध नोंदवला.

राळेगणसिद्धी (अहमदनगर)  - ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्या नवी दिल्ली येथील सत्याग्रह आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी जाणा-या रेल्वे व बसेस सरकारने रोखल्यामुळे राळेगणसिद्धीत मोदी सरकारच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन करत ग्रामस्थांनी निषेध नोंदवला.मोदी सरकारकडून 13 रेल्वे व अनेक बस अडवण्यात आल्याचा आरोप अण्णा हजारे यांनी केला आहे. या घटनेचा निषेध नोंदवण्यासाठी शुक्रवारी दुपारी 12 वाजता मोदी सरकारच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन करण्यात आले. 

अण्णा हजारेंचा गंभीर आरोपआमच्या आंदोलनात अडथळे आणले जात आहेत, असे म्हणत सरकारकडून लोकशाहीचा गळा दाबला जात असल्याचा आरोप ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी केला आहे. जनलोकपालची अंमलबजावणी, शेतकऱ्यांना हमीभाव अशा विविध मागण्यांसाठी अण्णा हजारे हे रामलीला मैदानावर आंदोलन करत आहेत. तत्पूर्वी, माध्यमांशी बोलताना त्यांनी मोदी सरकारवर टीका केली.

आतापर्यंत आमच्या आंदोलनात कधीच हिंसाचार झालेला नाही. पण सरकारला काय अनुभूती आली काय माहीत असा सवाल उपस्थित करत आमच्या लोकांच्या बसेस आणि रेल्वे रोखण्यात येत असल्याचा आरोप केला. लोकशाहीसाठी हे ठीक नसल्याचे ते म्हणाले.

टॅग्स :anna hazareअण्णा हजारेNarendra Modiनरेंद्र मोदी