अहमदनगर : ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांचे गेल्या सात दिवसांपासून राळेगणसिध्दीमध्ये उपोषण सुरू आहे. आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अण्णांचे मन वळविण्यासाठी राळेगणमध्ये दाखल झाले आहेत. तब्बल चार तासांपासून अण्णांशी चर्चा सुरु असून केंद्रिय कृषिमंत्री राधामोहन सिंग बैठकितून निघून गेले आहेत. दरम्यान अण्णा आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यातील बैठक अद्याप सुरूच आहे.केंद्रीय कृषिमंत्री राधामोहन सिंह बैठकीतून पाच वाजण्याच्या सुमारास निघून गेले. शेतक-यांना हमी भाव मिळावा, कृषी मूल्य आयोगाला स्वायत्ता मिळावी, स्वामिनाथन आयोग कोणताही आडपडदा न ठेवता लागू करावा, या भुमिकेवर अण्णा ठाम आहेत. त्यामुळे केंद्रिय कृषिमंत्री राधामोहन सिंग पाच वाजण्याच्या सुमारास बैठकितून निघून गेले.पत्रकारांशी बोलताना सिंग म्हणाले, स्वामिनाथन अहवालातील शिफारशी लागू करण्याच्या मागणीवर अण्णा ठाम आहेत. स्वामिनाथन यांनी लेख लिहून मोदी सरकार शेतक-यांसाठी चांगले काम करत असल्याचे मी अण्णांना सांगितले आहे. स्वामिनाथन यांनी लिहिलेला लेखही अण्णांना दाखवला असल्याचे राधामोहन सिंग यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.
अण्णा हजारे मागण्यांवर ठाम : चार तासांपासून बैठक सुरू, कृषिमंत्री राधामोहन सिंह यांची बैठकितून माघार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 05, 2019 5:54 PM