अहमदनगर : लोकपाल आणि लोकायुक्त नियुक्तीबाबत सरकारने आश्वासन देऊनही पूर्तता न केल्यामुळे ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे ३० जानेवारीपासून राळेगणसिध्दी येथे उपोषणाला सुरुवात करणार आहेत. यासह शेतीमालाला हमीभाव व इतर मागण्यांसाठी केंद्र व राज्य सरकारकडे वेळोवेळी पाठपुरावा केला आहे. मात्र अण्णा हजारे यांना आता एका गोष्टीचं दु:ख होत आहे.मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना लिहिलेल्या पत्रामध्ये त्यांनी हे दु:ख व्यक्त केले आहे. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री नसताना अण्णा हजारे यांना भेटले होते. तेव्हा फडवणीस यांनी राज्यात लोकायुक्त कायदा करण्याबाबत आश्वासन दिले होते. मात्र आता फडणवीस मुख्यमंत्री होऊन चार वर्षे झाले आहेत. तरीही राज्यात लोकायुक्त कायदा करण्यात न आल्यामुळे अण्णांना दु:ख होत आहे.‘‘मला एका गोष्टीचे दु:ख होत आहे की आपण मुख्यमंत्री नसताना ही राज्यात लोकायुक्त कायदा करण्याबाबत आश्वासन दिले होते व आज आपले सरकार सत्तेवर येऊन चार वर्षे होत आली मात्र लोकायुक्त कायदा झाला नाही. आपल्या बद्दल माझी एक आदरयुक्त भावना होती. लोकायुक्त कायद्याची अंमलबजावणी कराल अशी अपेक्षा होती पण...’’ असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पाठविलेल्या पत्रात म्हटले आहे.
अण्णा हजारे यांना होतेय एका गोष्टीचं दु:ख
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 18, 2019 5:51 PM