हळगाव : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांनी आपल्या सत्ताकाळात केलेले कार्य अतुलनीय होते. त्यांचे उत्तुंग कर्तृत्व पाहता त्यांच्या जन्मस्थळाचा सरकारने राष्ट्रीय स्मारक म्हणून विकास केला पाहिजे, असे सांगत चौंडीला राष्ट्रीय स्मारक घोषित करण्यात यावे. यासाठी मुख्यमंत्र्यांना भेटून मागणी करू. संसदेतही मागणी केली जाईल, असे प्रतिपादन खासदार उदयनराजे भोसले यांनी केले.पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या २९४ व्या जयंतीदिनी राष्ट्रवादीचे खासदार छत्रपती उदयनराजे भोसले यांनी चौंडी येथे काल भेट दिली. यावेळी त्यांनी स्मृतीस्तंभास अभिवादन केले. अहिल्यादेवी होळकर यांच्या गढी परिसरासह नक्षत्र गार्डनची पाहणी केली. यावेळी पालकमंत्री राम शिंदे, माजी मंत्री तथा चौंडी विकास प्रकल्पाचे शिल्पकार आण्णा डांगे, रश्मीताई बागल, अहिल्यादेवींचे मुळ वंशज अविनाश शिंदे, अक्षय शिंदे उपस्थित होते. पालकमंत्री प्रा राम शिंदे यांच्या निवासस्थानी खासदार उदयनराजे भोसले यांचा सन्मान करण्यात आला.चौंडी येथील अहिल्यादेवी होळकर जयंतीदिनी धनगर आरक्षणावरून पुन्हा गोंधळ होऊ नये याकरिता चौंडीत मोठा पोलिस फाटा तैनात करण्यात आला होता.
चौंडीला राष्ट्रीय स्मारक घोषित करा : उदयनराजे भोसले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 01, 2019 12:05 PM