राळेगणसिद्धी(अहमदनगर) : शेतक-यांच्या शेतमालाला उत्पादन खर्चावर आधारित हमी भाव मिळावा, लोकपाल आणि लोकायुक्ताची नियुक्ती यासह विविध प्रश्नाच्या मागण्यांसाठी आजपासूनचे जेष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांचे उपोषण स्थगित करण्यात आले आहे. जलसंपदामंत्री गिरीष महाजन हे सकाळी आठ वाजताच राळेगण सिध्दीमध्ये दाखल झाले होते. अखेर दोन तासांच्या चर्चेंनंतर अण्णा हजारे यांनी उपोषण स्थगित करण्याच्या निर्णय घेतला.विविध मागण्यांसाठी ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे आजपासून राळेगण सिध्दी येथील पद्मावती मंदिरात दहा वाजता उपोषणाला बसणार होते. तत्पुर्वी सकाळी आठ वाजताच सरकारच्या वतीने जलसंपदा मंत्री गिरीष महाजन राळेगणसिद्धीमध्ये दाखल झाले. तब्बल दोन तास हजारे व महाजन यांच्यामध्ये चर्चा सुरु होती. अण्णा हजारे यांच्याशी फोनवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही चर्चा केली. या चर्चे नंतर अण्णा हजारे यांनी उपोषणाचा निर्णय मागे घेतला.
अण्णा हजारे यांचे उपोषण स्थगित, जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्या शिष्टाईला यश
By ऑनलाइन लोकमत | Published: October 02, 2018 10:27 AM