शहरं
Join us  
Trending Stories
1
विक्रमी वर्ष! दक्षिण आफ्रिके विरुद्ध मालिका जिंकत टीम इंडियानं रचला इतिहास
2
"तुम्हाला आत टाकणार"; आदित्य ठाकरेंचा सदा सरवणकरांना भरसभेत इशारा
3
आधी २ 'बदक' आता 'पदक' मिळवणारी सेंच्युरी! संजूनं मोडला KL राहुलचा रेकॉर्ड
4
"शरद पवार फॅक्टर आहेत आणि राहतील, कारण..."; देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
5
रितिका-रोहित दुसऱ्यांदा झाले आई-बाबा! बेबी बॉयच्या स्वागतासाठी Junior Hit-Man चा ट्रेंड
6
"काळा डाग गुलाबी रंगाने झाकला जात नाही...", अमोल कोल्हेंचा नाव न घेता अजित दादांवर निशाणा
7
संजू सॅमसन अन् तिलक वर्मा दोघांची शतकं; टीम इंडियाच्या जोडीनं रचला खास विक्रम
8
IND vs SA : सर्वोच्च धावसंख्या, सर्वाधिक षटकार अन् दोन शतकवीर; मॅचमधील ५ रेकॉर्ड्स 
9
दिल्लीत पुन्हा ड्रग्सची मोठी खेप जप्त; आंतरराष्ट्रीय बाजारात तब्बल 900 कोटी रुपये किंमत
10
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
11
"लोकं आम्हाला सोडून गेले अन् आता सांगतात की..."; शरद पवारांचा हसन मुश्रीफांवर हल्लाबोल
12
भयानक...! धनत्रयोदशीला नवी कोरी इनोव्हा घेतलेली, अपघातात सहा तरुण मित्रमैत्रिणींचा जीव गेला
13
पॉवर प्लेमध्ये Sanju Samson अन् Abhishek Sharma नं दाखवली 'पॉवर'; पण...
14
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
15
लुटणाऱ्याचे पैसे घ्या, पण मनसेला मतदान करा; उल्हासनगरच्या सभेत राज ठाकरेंचे वक्तव्य 
16
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
17
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
18
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
19
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा
20
महायुती सत्तेत आली, तर मुख्यमंत्री कोण होणार? एकनाथ शिंदे अन् अजित दादांचं नाव घेत जयंत पाटलांची भविष्यवाणी!

दहशतवादविरोधी दिन : विशेष नगरच्या पार्सल बॉम्बस्फोटाचे गूढ वर्षभरानंतरही कायम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 21, 2019 12:50 PM

: नगर शहरात कुरिअर कार्यालयात झालेल्या पार्सल बॉम्बस्फोटाच्या घटनेला एक वर्ष होऊन गेले आहे़ या घटनेचे गूढ मात्र अद्यापही कायम असून, हा स्फोट कुणी घडवून आणला हे समोर आलेले नाही़

अरुण वाघमोडेअहमदनगर : नगर शहरात कुरिअर कार्यालयात झालेल्या पार्सल बॉम्बस्फोटाच्या घटनेला एक वर्ष होऊन गेले आहे़ या घटनेचे गूढ मात्र अद्यापही कायम असून, हा स्फोट कुणी घडवून आणला हे समोर आलेले नाही़ नाशिकच्या एटीएस (दहशतवादविरोधी) पथकाकडे या घटनेचा तपास आहे़ तपासी यंत्रणा मात्र अद्यापपर्यंत घटना घडविणाऱ्या सूत्रधारापर्यंत पोहोचू शकलेली नाही़शहरातील माळीवाडा परिसरात असलेल्या कौठीची तालमीजवळ मारुती कुरिअर कार्यालय आहे़ या ठिकाणी २० मार्च २०१८ रोजी रात्री साडेनऊ वाजेच्या सुमारास पार्सलमधील वस्तुचा स्फोट झाला़ या घटनेत कुरिअर कार्यालयातील कर्मचारी संदीप भुजबळ व संजय क्षीरसागर हे जखमी झाले़ या घटनेत संजय यांच्या डाव्या हाताच्या बोटांना इजा झाली होती तर भुजबळ हे किरकोळ जखमी झाले होते़ ज्या पार्सलचा स्फोट झाला ते पार्सल पुणे येथील सरहद्द संस्थेचे संस्थापक संजय नहार यांच्या नावे पाठविण्यात आले होते़ कुरिअरमधील कर्मचाऱ्यांनी ते हातात घेतल्यानंतर त्याचा स्फोट झाला़या घटनेचा तपास एटीएसकडे देण्यात आलेला आहे़ घटनेनंतर एटीएसने स्थानिक पोलिसांच्या मदतीने सर्व बाजू तपासून पाहिल्या़ सीसीटीव्ही फुटेज, संशयित आरोपीचे रेखाचित्र, मोबाईलचे कॉल रेकॉर्ड मात्र त्यांना अद्यापपर्यंत काहीच धागेदोरे हाती लागले नाही़ त्यामुळे हा स्फोट कुणी घडवून आणला, त्या मागचा उद्देश काय होता आणि पार्सल पाठविण्यासाठी नगर शहरातील कुरिअर कार्यालयच का निवडण्यात आले हे सर्व प्रश्न वर्षभरानंतरही अनुत्तरित आहेत़ या घटनेनंतर मात्र नगरचे दहशतवादीविरोधी पथक अलर्ट झाले असून, संवेदनशील ठिकाणाची त्यांच्याकडून नियमित तपासणी केली जात आहे़घटना टाळण्यासाठी व्यावसायिक, नागरिकांनी खबरदारी घ्यावी : नितीन पाटीलव्यावसायिक, नागरिकांनी खबरदारी घेतली तर बॉम्बस्फोटासारख्या घटना टळू शकतात अथवा पोलिसांना त्याबाबत माहिती मिळू शकते़ यासाठी सीम कार्ड खरेदी करताना ग्राहक म्हणून आपण जे आयडी प्रूफ देतो तेव्हा त्या झेरॉक्सवर ही प्रत केवळ सीमकार्ड खरेदीसाठीच देत आहोत असे नमूद करावे तसेच त्याखाली सही करून तारिख टाकावी़ यामुळे आपल्या कागदपत्रांचा गैरवापरहोणार नाही़ नागरिकांनीही संशयित व्यक्ती अथवा संशयित वस्तुबाबत पोलिसांना तत्काळ माहितीद्यावी़नगर शहरातील सर्व कुरिअरचालकांनी कार्यालयात सीसीटीव्ही कॅमेरे बसवून घ्यावेत़ कुरिअर घेऊन येणाºयांचे ओळखपत्र घ्यावे़ सायबर कॅफेचालकांनीही सीसीटीव्ही कॅमेरे लावून ओळखपत्र घेऊनच ग्राहकांना प्रवेश द्यावा, हॉटेल व लॉजचालकांनी ग्राहकांचे ओळखपत्र पाहूनच त्यांना रुम द्याव्यात़ याबाबत दहशतवादीविरोधी कक्षाकडून पडताळणी केली जाणार आहे़ जे व्यावसायिक याबाबत दक्षता घेणार नाहीत त्यांच्यावर कारवाई केली जाईल, असा इशारा नगरच्या दहशतवादविरोधी सेलचे प्रमुख नितीन पाटील यांनी दिला आहे़जखमीला मदत नाहीपार्सल बॉम्बस्फोटाच्या घटनेत संजय क्षीरसागर हे गंभीर जखमी झाले होते़ त्यांच्यावर नगरमधील खासगी रुग्णालयात सहा ते सात दिवस उपचार करण्यात आले़ शासनाकडून मात्र त्यांना अद्यापही काहीच मदत मिळालेली नाही़ क्षीरसागर हे सध्या त्याच कुरिअर कार्यालयात काम करत आहेत़

टॅग्स :Ahmednagarअहमदनगरahmednagar policeअहमदनगर पोलीस