शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रचाराला जाताना ठाकरे गटाच्या उमेदवाराला आला हार्ट अटॅक; तातडीनं रुग्णालयात दाखल
2
लोकसभेला शब्द देऊनही अजित पवारांनी पुरंदरमध्ये उमेदवार दिला; विजय शिवतारे संतापले...
3
“PM मोदींना महाराष्ट्रात ७-८ सभा घ्याव्या लागतात, स्वाभिमानी जनतेचा हा विजय”; सुप्रिया सुळेंचा टोला
4
"अजित पवार जे बोलले, याचं दुःख आयुष्यभर राहिल"; सुप्रिया सुळेंनी सुनावलं
5
शिंदेंचा कोल्हापुरात काँग्रेसला मोठा धक्का! विद्यमान आमदार जयश्री जाधव शिवसेनेत
6
Gold Price on Diwali: दिवाळीत वाढली सोन्या-चांदीची चमक; खरेदीपूर्वी पाहा खिशावर किती भार पडणार?
7
अंतरवाली सराटीत निर्णायक बैठक; समीकरण जुळले तर गोरगरीब सत्तेत बसेल, जरांगेंची भूमिका
8
ऐन दिवाळीत पाकिस्तानात 'ग्रीन लॉकडाऊन'!, याचा नेमका अर्थ काय? असा निर्णय का घेतला?
9
दिवाळीला शिंदे-ठाकरे गटाचे उमेदवार एकत्र, सोबत केली विठुरायाची आरती
10
लग्नानंतर पहिली दिवाळी एकत्र साजरी करण्यापूर्वीच कपलसोबत आक्रित घडलं अन् सारचं संपलं
11
“४४ वर्षे निष्ठेने काम केले, पण तिकीट नाकारले”; काँग्रेस नेते फडणवीसांच्या उपस्थितीत भाजपात
12
वळसे पाटलांच्या पराभवासाठी काय करायला हवं?; निकमांच्या कार्यकर्त्यांना शरद पवारांचा कानमंत्र
13
पुढील मुख्यमंत्री भाजपाचा, राज ठाकरेंच्या विधानावर CM एकनाथ शिंदे काय म्हणाले..?
14
प्रकाश आंबेडकर छातीत दुखू लागल्याने पहाटेच हॉस्पिटलमध्ये दाखल; अँजिओग्राफी होणार
15
कशी ठरते तुमची CTC; बेसिक सॅलरी, ग्रॉस सॅलरी आणि नेट सॅलरीत फरक काय? जाणून घ्या
16
“मनसे साथीने भाजपाचा CM होणार”; राज ठाकरेंच्या विधानावर देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
17
DC ला आली पहिल्या प्रेमाची आठवण? हेच असू शकतं पंतच्या 'ब्रेकअप' मागचं कारण 
18
'फॅन्ड्री'मधील जब्या आणि शालूने केलं लग्न ? मंडपातील फोटो व्हायरल
19
...म्हणून श्रीनिवास वनगा यांचं तिकीट कापलं, दीपक केसरकर यांनी नेमकं कारण सांगितलं
20
गुजरातमध्ये राष्ट्रीय एकता दिनी झळकला दुर्ग रायगड; पंतप्रधान मोदींनी मराठीतून दिली प्रतिक्रिया

इंदोरीकर महाराजांची दिलगिरी; वाचा डॉक्टर, शिक्षक, माता-भगिनींना लिहिलेलं पत्र

By ऑनलाइन लोकमत | Published: February 18, 2020 1:38 PM

तरीसुद्धा कोणाचं मन दुखावलं गेल्यास मी माफी मागतो, असं निवृत्ती महाराज इंदोरीकर म्हणाले आहेत.

ठळक मुद्देआक्षेपार्ह वक्तव्यामुळे वादात सापडलेले प्रसिद्ध कीर्तनकार इंदोरीकर महाराज यांनी अखेर आठ दिवसानंतर लेखी माफीनामा दिला आहे. माझ्या 'त्या' विधानाचा मीडियानं विपर्यास केला आहे. तरीसुद्धा कोणाचं मन दुखावलं गेल्यास मी माफी मागतोमहाराष्ट्रातील तमामा वारकरी, कथाकार, कीर्तनकार, शिक्षक-शिक्षिका, डॉक्टर, वकील आणि मानसन्मान असलेला तमाम महिला वर्गाची ही माफी मागतो. 

नगर: मुला-मुलीच्या जन्मासंदर्भात केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्यामुळे वादात सापडलेले प्रसिद्ध कीर्तनकार इंदोरीकर महाराज यांनी अखेर आठ दिवसानंतर लेखी माफीनामा दिला आहे. माझ्या 'त्या' विधानाचा मीडियानं विपर्यास केला आहे. तरीसुद्धा कोणाचं मन दुखावलं गेल्यास मी माफी मागतो, असं निवृत्ती इंदोरीकर महाराज म्हणाले आहेत. महाराष्ट्रातील तमाम वारकरी, कथाकार, कीर्तनकार, शिक्षक-शिक्षिका, डॉक्टर, वकील आणि मानसन्मान असलेला तमाम महिला वर्गाची ही माफी मागतो. आज गत आठ दिवसांपासून माझ्या कीर्तनरूपी सेवेतील ह्या वाक्यामुळे सोशल मीडिया व इलेक्ट्रॉनिक मीडियासह इतर समाजमाध्यमांत माझ्या अभ्यासानुसार मी केलेल्या वक्तव्याचा विपर्यास केला जात आहे. तरी मी वारकरी सांप्रदायाचा पाईक असून, मी माझ्या 26 वर्षांच्या कीर्तनरुपी सेवेत समाजप्रबोधन, समाजसंघटन, अंधश्रद्धा मिटवून विविध जाचक रुढी परंपरा यावर भर दिला होता. माझ्या कीर्तनरुपी सेवेतील या वाक्यानं कुणाच्या भावना दुखावल्या गेल्या असतील तर मी दिलगिरी व्यक्त करतो. माझ्यावरील प्रेम वृद्धिंगत व्हावे ही सदिच्छा, असंही इंदोरीकर महाराज म्हणाले आहेत.इंदुरीकर महाराज म्हणतात; 'कीर्तन सोडून शेती करेन; खूप मनःस्ताप झाला!'वादग्रस्त वक्तव्यानंतर इंदोरीकर महाराज म्हणाले, 'माझे सध्या वाईट दिवस...' गेल्या काही दिवसांपूर्वी निवृत्ती महाराज इंदोरीकरांनी मुला-मुलींच्या जन्माबाबत केलेल्या विधानावरून वादात साडपले. अंधश्रद्धा निर्मूलन समितीनं त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी केली होती. या सर्व प्रकारानंतर इंदोरीकर महाराज उद्विग्न झाले. दोन तासांच्या कीर्तनात एखादं वाक्य चुकीचं जाऊ शकतं. मात्र मी जे काही बोललो, ते चुकीचं नाहीच. मी बोललेलं अनेक ग्रंथात नमूद आहे, असा खुलासाही इंदोरीकर महाराजांनी केला होता. वादामुळे मला खूप त्रास होत आहे. एक दोन दिवस बघेन आणि कीर्तन सोडून शेती करेन,' अशी भावनाच इंदोरीकर महाराजांनी व्यक्त केली आहे.

या सर्व प्रकाराचे इंदोरीकर महाराजांनी यू ट्युबवाले आणि कॅमेरावाल्यांवर खापर फोडले आहे. 'यू ट्युबवाले आणि कॅमेरावाले माझ्या मागे लागलेत. इंदोरीकरला संपवायला निघालेत. मी कशात सापडेना म्हणून मला नको त्या प्रकरणात गुंतवण्याचा आटापिटा सुरू आहे. मी आता एका वेगळ्या निर्णयाप्रत आलेलो आहे. आता लय झालं. एखाद-दुसरा दिवस जाऊ द्यायचा. फेटा ठेवून द्यायचा. आपली सहन करायची कॅपॅसिटी संपलेली आहे,' असं त्यांनी सांगताच उपस्थित अवाक् झाले.

टॅग्स :indurikar maharajइंदुरीकर महाराज