गायकवाड यांनी आठ महिन्यांपूर्वी तोफखाना ठाण्याचा पदभार स्वीकारला होता. त्यांच्या कार्यकाळात तोफखाना हद्दीत नेहमीप्रमाणे चोऱ्या, लुटमार, खून, हाणामाऱ्या अशा अनेक घटना घडल्या. गायकवाड यांनी गुन्हेगारीला आळा घालण्याचा प्रयत्न केला. मात्र, इतर अधिकारी व कर्मचाऱ्यांकडून त्यांना अपेक्षित साथ न मिळाल्याने अनेक गुन्हेगारांना तातडीने जेरबंद करता आले नाही. येथील गुन्हे प्रकटीकरण शाखेचे कामकाजही नेहमीच वादग्रस्त ठरले आहे. या साऱ्या पार्श्वभूमीवर गायकवाड यांनी नियंत्रण कक्षात विनंती बदली करून घेतली. दरम्यान, गडकरी यांची आर्थिक गुन्हे शाखेतील कामगिरी चांगली राहिली आहे. रखडलेल्या काही गुन्ह्यांचा त्यांनी तातडीने तपास करून आरोपींना जेरबंद केले.
-----------------------------
जुगार क्लब, मटका अड्डे, बिंगो, अवैध दारू, गुटखा खुलेआम
तोफखाना पोलीस ठाणे हद्दीत नेहमीच सर्वच प्रकारची गुन्हेगारी सक्रिय असते. सध्याही जुगार क्लब, मटका अड्डे, बिंगो, अवैध दारू आणि गुटखा विक्री खुलेआम सुरू आहे. या अवैध व्यवसायांतूनच गुन्हेगारी फोफावत आहे. त्यामुळे गडकरी यांना प्रथम येथील अवैध व्यवसायांना आळा घालावा लागणार आहे.