अहमदनगर : यंदाचा उन्हाळा अत्यंत कडक असेल, याची झलक आतापासूनच दिसू लागली आहे. एप्रिल महिन्याच्या सुरुवातीलाच दुपारच्या वेळी तापमानाचा पारा ४० अंशावर गेला आहे. त्यामुळे एप्रिल महिना आणखी किती तीव्र असण्याची शक्यता आहे. नगर जिल्ह्यातही उन्हाचा कडाका वाढला असून तीव्र उन्हामुळे दुपारच्या वेळी लोकांनीही घराबाहेर पडणे कमी केले आहे.
गत महिन्यात अवकाळी पाऊस झाला. तसेच हवामानही ढगाळ होते. त्यामुळे उन्हाची तीव्रता फारच कमी होती. होळी होताच उन्हाची तीव्रता वाढली आहे. बाजारात खरबूज, टरबूज, काकड्या मोठ्या प्रमाणात विक्रीस आल्या आहेत. ताकाचे ठेलेही शहरी भागात सुरू झाले आहेत. रसवंत्यांही मोठ्या प्रमाणावर सुरू आहेत. उन्हाचा कडाका असल्याने दुपारच्या वेळी लोक घराबाहेर जाणे टाळत आहेत. त्यामुळे प्रमुख रस्त्यांवर, बाजारपेठेत शुकशुकाट दिसत आहे. नागरिकांकडून आधीच कोरोनामुळे मास्क लावला जात आहे. आता उन्हामुळे टोप्या, उपरण्यांचा वापर वाढला आहे. महिला स्कार्फसह घराबाहेर पडत आहेत. दरम्यान कोरोनामुळे रात्री आठनंतर दुकाने बंद असतात, तर दुपारच्या वेळी तीव्र उन्हामुळे बाजारहाट कधी करायचा, याबाबत नागरिकांमध्ये संभ्रम आहे. त्यात नगर शहरात झाडांची कमतरता असल्याने घराबाहेर पडल्यानंतर सावलीचा आश्रय घेण्यासाठी जागाच नसल्याचे दिसून येते आहे.
-------
दुपारच्या वेळी तापमान ४० अंशावर
आठवड्यात ३५ ते ३६ अंशावर तापमान होते. ते आता सरासरी ३८ अंशापर्यंत सरकले आहे, तर दुपारी दोन ते तीन या वेळेतील तापमान ४० अंशाच्या पुढे सरकले आहे. सध्या हवामान कोरडे असल्याने उन्हाची तीव्रता जास्त जाणवत आहे.
---------
३) आठवडा तापणार
चालू आठवड्यात ३८ ते ३९ असे सरासरी तापमान राहील, असे हवामान खात्याच्या संकेतस्थळावर नमूद करण्यात आले आहे. हवामान कोरडे राहणार असून काही ठिकाणी तापमानाचा पारा ३८ अंशाच्या वर जाईल. त्यामुळे उन्हाचा पारा ४२ अंशावरही जाऊ शकतो. त्यामध्ये ५ एप्रिल, ६ एप्रिल आणि ७ एप्रिल या दिवशी हवामान कोरडे राहणार असल्याचे हवामान खात्याने म्हटले आहे. त्यामुळे उष्णतेची तीव्रता जास्त राहणार आहे. ५ ते ९ एप्रिलदरम्यान आकाश निरभ्र आणि सायंकाळनंतर ढगाळ राहणार आहे. त्यामुळे उन्हाची तीव्रता सायंकाळच्या वेळी कमी राहील.
---
डमी- नेट फोटो
३१ एप्रिल हीट डमी
हीट
---------------
फोटो- साजीदचे फोटो वापरणे