अरे एवढे दिवस झोपा काढल्या का? अजित पवारांचा राज ठाकरेंना अप्रत्यक्ष टोला

By ऑनलाइन लोकमत | Published: April 6, 2022 04:18 PM2022-04-06T16:18:29+5:302022-04-06T16:18:58+5:30

"राज्यात काही जण अचानक बाहेर निघाली आणि अचानकच भोंगे बंद करण्याची भाषा करू लागली आहेत," अजित पवार यांचं वक्तव्य

are you sleeping for so many days asked deputy chief ajit pawar mns chief raj thackeray gudi padwa melava loud speakers on masjid | अरे एवढे दिवस झोपा काढल्या का? अजित पवारांचा राज ठाकरेंना अप्रत्यक्ष टोला

अरे एवढे दिवस झोपा काढल्या का? अजित पवारांचा राज ठाकरेंना अप्रत्यक्ष टोला

अहमदनगर जिल्ह्यातील कोपरगाव येथील पोलीस ठाणे इमारत, बसस्थानक, पंचायत समिती इमारत उद्घाटन तसेच शंकरराव काळे यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण आदी कामांचे उद्घाटन राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Deputy CM Ajit Pawar) यांच्या हस्ते करण्यात आले. या वेळी भाषणादरम्यान अजित पवारांनी मनसे प्रमुख राज ठाकरे (MNS Chief Raj Thackeray) यांचं नाव न घेता टीका केली. "राज्यात काही जण अचानक बाहेर निघाली आणि अचानकच भोंगे बंद करण्याची भाषा करू लागली आहेत. अरे एवढे दिवस काय झोपा काढल्या होत्या काय?,"| असा सवाल त्यांनी केला.

"भोंग्या बद्दल बोलणाऱ्यांपैकी मागील सरकारमध्ये कोणी नव्हते का? सध्या काही लोक अशाच वेगवेगळ्या गोष्टी पुढे आणायचं काम करतायेत. विकासाला महत्त्व देण्याऐवजी वेगळी चर्चा समाजात घडवून आणायची समाजात वितुष्ट कसे निर्माण होईल, दरी कशी निर्माण होईल हे पाहिलं जात आहे. आपण किती वर्षांपासून महाराष्ट्रात गुण्यागोविंदाने राहत आहोत. एकमेकांच्या सणांचा आदर करतोय. एकमेकांना शुभेच्छा देतो आहोत. ही आपली संस्कृती हीच आपली परंपरा आहे," असं अजित पवार म्हणाले. "छत्रपती शिवाजी महाराज यांची शिकवण आहे. शाहू-फुले-आंबेडकरांनी हाच विचार मांडला आहे. अशा भोंग्याच्या गोष्टी करून विकास होत नाही. विकासाला आपण महत्त्व देऊ या," असंही त्यांनी नमूद केलं.

आम्ही तीनही पक्षांचे लोक वेगवेगळ्या विचारधारेचे असूनही लोकांचे भले करण्यासाठी एकत्र आलो असल्याचंही पवार म्हणाले. या कार्यक्रमाला राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील, जिल्ह्याचे पालकमंत्री हसन मुश्रीफ, खासदार डॉ. सुजय विखे पाटील, साईबाबा संस्थानचे अध्यक्ष तथा आमदार आशुतोष काळे, माजी आमदार अशोक काळे, आमदार डॉ. सुधीर तांबे, माजी आमदार भानुदास मुरकुटे, दादाभाऊ कळमकर, चंद्रशेखर घुले, जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा राजश्री घुले, रयत शिक्षण संस्थेच्या मिनाताई जगधने,  चैताली काळे, सुरेश वाबळे आदी उपस्थित होते.

"पुढील वेळी मताधिक्य वाढलं पाहिजे"
"आम्ही सात-सात वेळेला लाखा-लाखाने निवडून गेलो. या वेळी आम्हाला कस बस निवडून आणले आहे. मी तर माझ्या एक राऊंडला हजारो मते घेतो. हसन मुश्रीफ ४० हजार, वळसे पाटील ६० हजार तर मी एक लाख २० हजार मताधिक्याने निवडून आलो. ही कामे करताना आम्ही साधू-संत नाही. आम्ही माणसे आहोत. आमच्या विचारांचा तरूण माणूस निवडून दिला, म्हणून ही विकासकामे देतोय. मात्र पुढच्या वेळी मताधिक्या वाढले पाहिजे ही हात जोडून विनंती," असंही ते म्हणाले. अजित पवारांनी करताच उपस्थित काही कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी सुरू केली. हे पाहून अजित पवार म्हणाले, "घोडा मैदान दूर नाही. जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांत तुम्ही काय करता ते पाहू. जिल्हा परिषद, पंचायत समिती व नगरपालिका निवडणुकीत मी सांगितलेली कामे केली नाहीत तर पाहा पवारांची औलाद नाही. अशी आहे का धमक तुमची, असा दमही अजित पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना भरला.

Web Title: are you sleeping for so many days asked deputy chief ajit pawar mns chief raj thackeray gudi padwa melava loud speakers on masjid

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.