जवळे : पारनेर तालुक्यातील गुणोरे- गाडीलगाव ग्रुप ग्रामपंचायतींतर्गत गुणोरे येथे तीन वर्षांपूर्वी चौदाव्या वित्त आयोग २०१५-१६ ग्रामनिधीअंतर्गत सात लाख खर्चून पाणी शुद्धीकरण प्रकल्प आरो प्लांट सुरू केला होता. हा प्लांट नागरिकांसाठी आरोग्यदायी ठरत आहे, अशी माहिती ग्रामसेवक दिलीप रासकर यांनी दिली.
हा प्लांट माजी सरपंच चंद्रभागा जयसिंग बडे यांच्या काळात सुरू करण्यात आला होता. तीन वर्षांपासून २४ तास सेवा सुरू असून, ‘ना नफा, ना तोटा’ या तत्त्वावर चाळीस पैसे लिटरप्रमाणे नागरिकांना पाणी उपलब्ध होत आहे.
-सरपंच, राधाबाई प्रमोद खोसे, उपसरपंच कचरशेठ
कारखिले म्हणाले की, गुणोरे कुकडी नदीच्या तीरावर आहे. त्यामुळे या परिसरातील विहिरींना असलेले पाणी खारे व क्षारयुक्त आहे. त्यामुळे नागरिकांना विविध आजारांना सामोरे जावे लागत होते. तीन वर्षांपूर्वी सुरू करण्यात आलेल्या आरो प्लांटमुळे नागरिकांचे सर्दी, पोटाचे आजार पूर्णपणे बंद झाले. त्यामुळे गावाच्या आरोग्यात चांगल्या प्रकारे सुधारणा झाली. लवकरच गाडीलगावमध्येही आरो प्लांट सुरू करणार असल्याचे त्यांनी सांगितले.
--
पाण्यासाठी एटीएम
पाण्यासाठी गावातील प्रत्येक नागरिकाला एटीएम कार्ड दिलेले आहे. एटीएममध्ये रक्कम शिल्लक आहे तोपर्यंत संबंधित नागरिक केव्हाही पाणी घेऊन जाऊ शकतात, तसेच वीजपुरवठा खंडित झाला, तर नागरिकांची गैरसोय होऊ नये यासाठी इन्व्हर्टरचीही सोय आहे.
--
२८ गुणाेरे
गुणोरे येथील आरओ प्लांटमधून एटीएमद्वारे पाणी भरताना नागरिक.