शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Election: मवीआच्या 22 उमेदवारांची अनामत रक्कम जप्त, सर्वाधिक काँग्रेसचे; भाजपचा एकही नाही!
2
“सुप्रीम कोर्टाने काय करावे, हे आता एक पक्ष सांगणार का?”; चंद्रचूड यांनी ठाकरे गटाला फटकारले
3
चिन्मय दास यांच्या अटकेवरून बांगलादेशात हाहाकार! पोलिसांनी डागले 'ग्रेनेड', लाठीचार्जही केला; एकाचा मृत्यू
4
'मी नेहमी संविधानाच्या मर्यादेचा आदर केला...', संविधान दिनानिमित्त पंतप्रधान मोदींचे भाष्य
5
“अशा निवडणुका पाकिस्तान, अफगाणिस्तानात होत नसतील, आयोग जिवंत आहे का”; संजय राऊत संतापले
6
मनोज जरांगेंचे ठरले; सरकार स्थापन झाल्यावर तारीख जाहीर करणार, पुन्हा बेमुदत उपोषणाला बसणार
7
जगातील सर्वात वृद्ध व्यक्तीचे वयाच्या 112 व्या वर्षी निधन; काही दिवसांपूर्वीच दीर्घायुष्यासंदर्भात केलं होतं भाष्य
8
पाकिस्तानात तख्तापालट होण्याचे संकेत? इम्रान खान यांच्या समर्थकांसोबत सैन्य; हस्तांदोलन, मिठ्या मारल्या 
9
"दहशतवादी संघटनांना चोख प्रत्युत्तर देणार"; २६/११च्या हल्ल्याच्या वर्षपूर्तीनिमित्त पंतप्रधान मोदींचे आश्वासन
10
झुनझुनवाला यांनी 10 मिनिटांत कमावले ₹105 कोटी; 'या' दोन शेअर्समुळे लागली लॉटरी; पडला पैशांचा पाऊस!
11
"अजित पवारांनी सरेंडर होऊन आमची..."; रामदास कदमांचे मोठं विधान, म्हणाले, "काहीही केलं तरी..."
12
नाना पटोलेंनी दिल्ली गाठली, मल्लिकार्जून खरगे-राहुल गांधींची भेट घेतली; नेमके काय घडले?
13
BLOG: अमित ठाकरे निवडणुकीच्या चक्रव्यूहात शिरले खरे, पण...; 'राजपुत्रा'चं नेमकं काय चुकलं? सहा प्रमुख मुद्दे
14
...म्हणून मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करण्यास विलंब; भाजपचे 'या' कामाला प्राधान्य
15
आधारवाडीतील इमारतीच्या पंधराव्या मजल्यावर भीषण आग; अग्निशमन दलाचे वाहन बिघडले
16
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
17
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
18
"हिंदूंच्या हक्कांसंदर्भात बोलणारे निर्लज्ज, ...या सरकारला भारतातील अल्पसंख्यकांची चिंता नाही"; काय म्हणाले ओवेसी?
19
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
20
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले

शहरातील मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त करा : विरोधकांचा आयुक्तांना घेराव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 22, 2019 2:12 PM

शहरातील विविध भागात मोकाट कुत्र्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. नागरिकांना मोठ्या प्रमाणात या कुत्र्यांचा त्रास होत आहे.

अहमदनगर : शहरातील विविध भागात मोकाट कुत्र्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. नागरिकांना मोठ्या प्रमाणात या कुत्र्यांचा त्रास होत आहे. अनेक नागरिकांना कुत्र्यांनी चावा घेतला आहे, त्यामुळे महापालिका प्रशासनाने यावर उपाययोजना करून त्वरित बंदोबस्त करण्याची मागणी राष्ट्रवादीचे नगरसेवक कुमार वाकळे यांनी मनपाच्या सभेत केली.यावेळी नगरसेवक मुद्दसर शेख यांनी प्रभाग १० मध्ये एसटी कॉलनीमध्ये राहणा-या आयुष प्रजापती या मुलास कुत्र्याने चावा घेतला. यामध्ये येणारा सर्व खर्च महापालिकेने द्यावा, असे निवेदन दिले.

राष्ट्रवादी काँग्रेसचे महापालिकेत आक्रमक आंदोलन मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त करण्याकडे दुर्लक्ष केल्यामुळे आज एका निष्पाप बालकाला आपला जीव गमवावा लागला. यास जबाबदार असणा-या संबंधित आरोग्य अधिका-यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करून या निष्क्रिय अधिका-यांना तात्काळ बडतर्फ करण्याची मागणी सर्व राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक, पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी महापालिकेत जोरदार आंदोलन करत केली.वारंवार आंदोलने व मोर्चे काढून मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी नगरसेवक करीत आहेत. त्यानंतरही प्रशासनाकडून उपाययोजना न झाल्यामुळे हे प्रकार घडले आहेत. आरोग्याधिकारी याकडे दुर्लक्ष करत आहेत. या प्रकरणी संबंधितावर तात्काळ निलंबनाची कारवाई करावी, संबंधित कुटुंबाला नुकसान भरपाई मिळावी अशी मागणी प्रशासनाकडे करण्यात आली आहे. आंदोलनात राष्ट्रवादी कॉंग्रेसचे माजी शहराध्यक्ष प्रा.माणिकराव विधाते, उपाध्यक्ष बाबासाहेब गाडळकर, नगरसेवक कुमार वाकळे, संपत बारस्कर, अविनाश घुले, प्रकाश भागानगरे, माजी नगरसेवक निखिल वारे, अजिंक्य बोरकर, प्रा.अरविंद शिंदे, सारंग पंधाडे, महेश बुचडे, वैभव ढाकणे सहभागी झाले होते.

टॅग्स :Ahmednagarअहमदनगर