संगमनेर : संगमनेर नगर परिषदेच्या क्रीडांगण समोरील अभंग मळा परिसरात रविवारी (दि.२६) पहाटे साडेचारदरम्यान अज्ञाताने दोन दुचाकी आणि एक चारचाकी अशी एकूण तीन वाहने पेटवून दिली. ही वाहने जळून मोठे नुकसान झाले आहे. याप्रकरणी संगमनेर शहर पोलीस ठाण्यात अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
भारतीय जनता पक्षाच्या ओबीसी मोर्चाचे संगमनेर शहराध्यक्ष संपत रामचंद्र गलांडे यांच्या घरासमोर उभी असलेली वाहने अज्ञाताने पेटवून दिली. गलांडे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून पोलिसांनी गुन्ह्याची नोंद घेतली आहे. गलांडे यांनी त्यांच्या घरासमोरील भागात पत्र्याच्या शेडमध्ये वाहने उभी केली होती. यातील सफारी या चारचाकी वाहनासह (एम. एच. १७, ए. झेड. ६०९३) इतरही दोन दुचाकी वाहने रविवारी पहाटे साडेचारदरम्यान अज्ञात व्यक्तीने अज्ञात कारणाने पेटवून दिली. यात एकूण ११ लाख दहा हजार रुपयाचे नुकसान झाल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. वाहने जळीतकांड घटनेने संगमनेर शहरात खळबळ उडाली आहे. ही वाहने कुणी जाळली. याचा पोलीस शोध घेत आहेत. शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक मुकुंदराव देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक पंकज शिंदे अधिक तपास करीत आहेत.
फोटो नेम : २६०९२०२१ संगमनेर जळीतकांड, ओळ : ळालेली वाहने