अहमदनगर : केडगाव येथील शिवसेनेच्या कार्यकर्त्यांच्या दुहेरी हत्याकांड प्रकरणी आमदार संग्राम जगताप यांना पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतर पोलीस अधीक्षक कार्यालयाची मोडतोड करण्यात आली होती. तसेच आ. संग्राम जगताप यांना पळवून नेण्यात आले होते. या प्रकरणी राष्ट्रवादी कॉग्रेसच्या अडीचशे ते तीनशे कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर आमदार अरुण जगताप फरार होते. आज ते स्थानिक गुन्हे शाखेत हजर झाले असून दुपारी त्यांना न्यायालयात हजर करण्यात येणार आहे.केडगाव घटनेनंतर तात्त्काळ आमदार संग्राम जगताप यांना चौकशीसाठी रात्री पोलीस अधीक्षक कार्यालयात आणले असताना राष्ट्रवादी मोठ्या संख्येने कार्यकर्ते कार्यालयात दाखल झाले. या कार्यकर्त्यांनी पोलीस अधीक्षक कायार्लायवर दगडफेक करुन, कार्यालयाचे दरवाजे लाकडी दांडक्याने तोडून सार्वजनिक मालमत्तेचे नुकास करुन अनधिकृतरित्या कार्यालयात प्रवेश केला व बंदोबस्तासाठी असलेले पोलीस अधिकारी, कर्मचारी व महिला पोलीस कर्मचारी यांना शिवीगाळ करुन धक्काबुक्की करत सरकारी कामात अडथळा निर्माण केला. पोलीस नाईक संदीप घोडके यांना मारहाण करुन जखमी केले. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.
आमदार अरूण जगताप पोलिसांत हजर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 13, 2018 12:45 PM