संगमनेर : ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी पारनेर तालुक्यातील राळेगणसिध्दी येथे सुरू केलेल्या उपोषणाला राष्ट्रीय किसान महासंघाचे प्रदेश उपाध्यक्ष अरुण कान्होरे यांनी पाठिंबा देत उपोषण सुरू केले आहे. उपोषणाच्या पाचव्या दिवशी त्यांची प्रकृती खालावली आहे. रक्तदाब व रक्तातील साखरेचे प्रमाण वाढले असून वजनही दोन किलोने कमी झाल्याची माहिती घारगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. भाऊसाहेब डामसे यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली.रविवारी घारगाव येथील डॉ. अमोल ढमढेरे व डॉ. अजित भंडारी यांनीही कान्होरे यांच्या प्रकृतीची तपासणी केली असता किडनीला सूज येण्याची शक्यता वर्तविली आहे. संगमनेर तालुक्यातील आंबी खालसा गावातील मारूती मंदिरात कान्होरे यांनी पाच दिवसांपासून उपोषण सुरू केले आहे. नगराध्यक्षा दुर्गा तांबे, जिल्हा परिषदेच्या कृषी व पशुसंवर्धन विभागाचे सभापती अजय फटांगरे, महाराष्टÑ नवनिर्माण सेनेचे जिल्हा उपाध्यक्ष किशोर डोके, शिवसेनेचे तालुकाप्रमुख जर्नादन आहेर, राष्ट्रवादीचे जिल्हा सरचिटणीस बाळासाहेब ढोले, पंचायत समिती सभापती निशा कोकणे, सदस्या प्रियांका गडगे, आंबी खालसा सरपंच अरुणा भुजबळ, उपसरपंच सुरेश कान्होरे, खंदरमाळवाडी सरपंच वैशाली डोके, उपसरपंच प्रमोद लेंडे, राहुल कान्होरे, नितीन काशीद, अर्चना बालोडे, दत्तात्रय कान्होरे, नंदकुमार कान्होरे, दीपक ढमढेरे, सजेर्राव ढमढेरे, संतोष मुंढे, अविनाश भोर, बाळासाहेब गाडेकर, प्रमोद मुंढे, सुरेश मुंढे, नितीन आहेर, अख्तार सय्यद, अमोल कहाणे, मिलिंद थोरात, तान्हाजी मुंढे आदींनी कान्होरे यांची भेट घेत त्यांच्या उपोषणाला पाठिंबा दिला आहे.
अरूण कान्होरे यांची प्रकृती खालावली : अण्णा हजारे यांच्या उपोषणाला पाठिंबा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 03, 2019 2:08 PM