शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'कारखाने विकत घ्यायला मी काही महाराष्ट्रभर हिंडलो नाही'; जयंत पाटलांनी अजित पवारांना डिवचले
2
"जेव्हा पराभव समोर दिसतो, तेव्हा 'असे' नॅरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न सुरू होतो"; प्रविण दरेकर यांचा सुप्रिया सुळेंना टोला
3
"बंद सम्राटांना कायमचं घरात बंद करायची वेळ आलीय"; CM शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर अप्रत्यक्ष निशाणा
4
अचानक मोठा विकेंड जाहीर! १५ ते २० नोव्हेंबर 'या' शाळा बंद राहणार; शासनाचा मोठा निर्णय
5
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'काल माझं अन् शरद पवारांचं भांडण झालं, त्यांनी सात सभा..."; सुप्रिया सुळेंनी सगळंच सांगितलं
6
गुंतवणूकदार विचित्र परिस्थितीत अडकले! शेअर ६१ हजारांनी पडला पण विकताही येत नाहीय...
7
दिल्ली महापौरपदासाठी भाजपचा उमेदवार अवघ्या ३ मतांनी हरला; आपची महापालिकेवर सत्ता
8
“मोदींनी ११ वर्षात काय केले? महाराष्ट्राच्या निवडणुकीचा ३७० कलमाशी काय संबंध?”: खरगे
9
काव्या मारनने संघाबाहेर काढलं, त्यानेच टीम इंडियाला रडवलं! आता लागणार १० कोटींची बोली?
10
बाळासाहेबांची इच्छा आम्ही पूर्ण केली, छ. संभाजीनगरच्या नामकरणावरुन PM मोदींचा उद्धवसेनेवर 'बाण'
11
घुसखोरांनाही ४५० रुपयांत गॅस सिलेंडर देणार; काँग्रेस नेत्याच्या विधानानं नवा वाद
12
गाझामध्ये इस्रायलचं तांडव, संपूर्ण कुटुंब नष्ट; शेजारी म्हणाला, "केवळ एकच मुलगा वाचला, पण तोही...!"
13
"गद्दारी केली तर लाज वाटण्यासारखं काहीच नाही"; दिलीप वळसेंच्या लेकीचे शरद पवारांना प्रत्युत्तर
14
महाराष्ट्रात मविआ सरकार स्थापन करु, एकही प्रकल्प बाहेर जाऊ देणार नाही; राहुल गांधींचा शब्द
15
BSNL नं लॉन्च केली भारतातील पहिली Satellite-to-Device सर्व्हिस, आता नेटवर्कशिवायही करू शकाल कॉलिंग!
16
विरोधक सत्तेत आले तर पहिली लाडकी बहीण योजना बंद पाडतील; नरेंद्र मोदींची टीका
17
पंकजांनंतर अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; म्हणाले, "मी सेक्युलर हिंदू पण..."
18
"विद्यार्थ्यांची मागणी न्यायपूर्ण, सामान्यीकरण अस्वीकार्य ..."; राहुल गांधींनी प्रयागराजमधील आंदोलनावर दिली प्रतिक्रिया
19
"काही ईव्हीएम मशिनमध्ये गडबड! असं परदेशी माणूस म्हणतोय..."; सुप्रिया सुळे यांचा मोठा दावा
20
'या' देशातील ६ आंदोलनकर्त्यांना मृत्यूदंडांची शिक्षा; सरकारविरोधी निदर्शनांमध्ये होता सहभाग

तपस्वी देशभक्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 19, 2019 4:47 PM

आयुष्यभर खादीची भगवी लुंगी, भगवा पंचा, पायात लाकडी खडावा आणि एक तांब्या एवढाच ऐवज त्यांच्याजवळ होता. प्रत्यक्ष पैैशाला कधीही स्पर्श केला नाही. असे कडकडीत वैैराग्य स्वामी सहजानंद भारती यांचे होते. स्वामीजींनी त्यांची व्यक्तिगत माहिती कधी कोणाला कळू दिली नाही. त्यांची भारतीय स्वातंत्र्य लढा, राजकीय, शैक्षणिक कामगिरी पाहता ते एक महान तपस्वी, देशभक्त होते.

अहमदनगर : फुलाचा सुगंध अनुभवता येतो पण तो शब्दात व्यक्त करता येत नाही. तसेच काहीसे परमपूज्य स्वामी सहजानंद भारती यांच्या जीवन चरित्राबद्दल म्हणता येईल. ते मूळचे कुठले? त्यांचे पूर्वाश्रमीचे नाव कोणते? गाव कोणते? प्रदेश कोणता? मातृभाषा कोणती? त्यांचे शिक्षण काय? त्यांच्या गुरूंचे नाव काय? अशी त्यांची व्यक्तिगत माहिती कधीच कोणाला कळली नाही. आई-वडील, बहीण-भाऊ, गणगोताची माहिती कोणाला कळली नाही. त्यांना स्वत:बद्दल बोलताना कधीच कुणी ऐकले नाही. ज्यांचा बायोडेटाच हाती नसताना त्यांचे जीवनचरित्र कसे लिहायचे हा प्रश्नच होता. त्यांचे सर्व जीवनच उघड्या पुस्तकासारखे होते. त्यात मी पणाला कुठेच थारा नव्हता. संपूर्ण आयुष्यभर कमरेला खादीची भगवी लुंगी, खादीचा भगवा पंचा, पायात लाकडी खडावा आणि एक तांब्या एवढाच दानात मिळालेला ऐवज त्यांच्याजवळ होता. प्रत्यक्ष पैैशाला कधीही स्पर्श झाला नाही. असे कडकडीत वैैराग्य. वयाच्या २२ व्या वर्षी हिंदू धर्म ग्रंथांचा समग्र अभ्यास करून स्वामीजी ही सर्वोच्च पदवी प्राप्त करून त्यांनी संन्यासाची दीक्षा घेतल्याचे समजते. दीक्षा घेतल्यानंतर संन्याशी समूहाने सर्व भारतभर पायी भ्रमण केले. पोटापुरतीच भिक्षा मागायची, कोणत्याही गावात चार दिवसांपेक्षा जास्त दिवस थांबायचे नाही. कुणाच्या घरात थांबायचे नाही. गावाबाहेर तात्पुरती कुटी बांधायची आणि मुक्काम करायचा. गाव सोडतान कुटी जाळून टाकायची म्हणजेच मोह जाळून टाकण्यासारखेच होते. आर्त, जिज्ञासू, अर्थार्थी व ज्ञानी असे भक्तांचे चार प्रकार आहेत. स्वामीजी हे परमेश्वरांचे सर्वोच्च ज्ञानी भक्त होते. ते परमपदाला पोहोचले होते. वेद, उपनिषदे, गीता, भागवत, न्याय पूर्व मिमांसा, उत्तर मिमांसा, ब्रम्ह सूत्रे हे ग्रंथ त्यांच्या केवळ मुखोद्गतच नव्हते तर त्यांच्या कृतीत अवतरले होते. तो त्यांच्या जीवनाचा अविभाज्य भाग झाला होता. ते पंडित होते, पण त्यांनी कधीही पांडित्याचे प्रदर्शन केले नाही. इंग्रजी व संस्कृत भाषेवर त्यांचे प्रचंड प्रभूत्व होते. सॉक्रेटीस, अ‍ॅरिस्टॉटल आदी सर्व जगातील कीर्तीच्या तत्ववेत्त्यांच्या तत्वज्ञानाचा त्यांनी सखोल अभ्यास केला होता. दशनाम गोसावी या पंथाथील भारतीय संप्रदायाचे ते अनुयायी होते. ते हिंदू होते. पण हिंदुत्ववादी नव्हते. इतर धर्माचा ते द्वेष करीत नव्हते. भेदभावाच्या पलीकडे ते केव्हाच जाऊन पोहोचले होते. नाऊर (ता. श्रीरामपूर) हे गाव गोदावरी नदीकाठी वसलेले आहे. साधारणत: १९१५ साली स्वामीजींचे नाऊर येथे आगमन झाले असावे. गोदावरीला उदंड पाणी असे. नदीकाठी महादेवाचे मंदिर आहे. या मंदिरात बंब महाराज नावाचे साधू राहत असत. त्र्यंबकेश्वर (नाशिक) येथे त्या सुमारास सिंहस्थ पर्वणी होती. बंब महाराज त्र्यंबकेश्वर येथे सिंहस्थ पर्वणीसाठी गेले होते. तेथे दशनाम आखाड्यात त्यांची स्वामीजींशी गाठ पडली. स्वामीजी अत्यंत तरुण व तेजपुंज संन्यासी होते. त्यावेळी गोदाकाठी सद्गुरू गंगागिरी महाराजांनी मोठे धार्मिक परिवर्तन घडवून आणले होते. बंब महाराजांकडून गंगागिरी महाराजांच्या कार्याचे वर्णन स्वामीजींनी ऐकले आणि ते भारावून गेले. गंगागिरी महाराजांचे थोर कार्य ऐकून खूप प्रभावित झाले आणि त्यांनी बंब महाराजांसमवेत नाऊर येथे येण्याचा निर्णय घेतला. नाऊर येथे आल्यानंतर ते गोदाकाठी बंब महाराजांबरोबर महादेव मंदिरात राहू लागले. गोदावरी परिसरातील परिवर्तन त्यांनी अनुभवले आणि नाऊर येथे वास्तव्य करण्याचा निर्णय घेतला. नाऊरपासून जवळच पुणतांबे गावालगत बापतरे म्हणून एक खेडे गाव आहे. तेथे दरवर्षी ह.भ.प.व्यंकट स्वामी यांचे कीर्तन होत असे. व्यंकट स्वामी हे वारकरी संप्रदायाचे थोर कीर्तनकार होते. पंढरपूर येथे त्यांचा मोठा मठ होता. बापतरे येथे व्यंकट स्वामींचे कीर्तन होते. बंब महाराज व नाऊरकरांचे बरोबर स्वामीजीही कीर्तनाला गेले होते. ते संपल्यावर व्यंकट स्वामींनी या तरुण संन्याशाशी बातचीत केली. स्वामीजींचा अध्यात्मातील अधिकार पाहून ऐंशी वर्षांचे व्यंकट स्वामी या तरुण संन्याशासमोर नतमस्तक झाले. स्वामीजींची योग्यता आणि श्रेष्ठता पाहून गावकरी चकित झाले. त्यानंतर व्यंकट स्वामींचा आणि स्वामींचा घनिष्ट संबंध शेवटपर्यंत टिकला. नाऊर येथील शेतकरी तुकाराम देसाई यांची पत्नी स्वर्गीय कोंडाबाई या विठ्ठल भक्त होत्या. कोंडाबार्इंची माहेरची ५० एकर शेती होती. त्यांचे निधन झाल्यानंतर विठ्ठल, रखुमाई यांच्या मूर्ती तुकाराम देसाई यांच्याकडे आल्या. त्या मूर्ती स्वामीजींकडे अर्पण करण्याचा निर्णय तुकाराम देसाई आणि त्यांचा एकुलता एक मुलगा दामोदर यांनी घेतला. त्यासाठी आठ एकर जागा दिली. त्या जागेवर स्वामीजींनी गोदावरी आश्रमाची स्थापना केली. विठ्ठल-रखुमाईचे छोटेसे मंदिर बांधले. देणगी मिळालेली जमीन स्वामीजींनी स्वत:च्या नावावर न घेता स्थानिक पंच कमेटीच्या नावावर केली होती. देणगीदार तुकाराम देसाई हे प्रस्तुत लेखकाचे आजोबा होते व स्व.दामोदर देसाई यांचे ज्येष्ठ चिरंजीव आहेत. मूळ नाऊर येथील परंतुु व्यापारासाठी कोपरगाव येथे गेलेले व्यापारी स्व.प्रेमचंदजी लोहाडे यांनी गोदावरी आश्रमासाठी १८ खणी पक्क्या इमारतीचे बांधकाम करून दिले होते. स्वामीजींची अध्यात्मिक क्षेत्रातील विद्वत्ता महाराष्ट्रभर गेली होती. अनेक साधू, संत त्यांच्या भेटीसाठी नाऊर येथे येऊ लागले होते. महाराष्ट्रातील ज्येष्ठ कीर्तनकार ह.भ.प. प्रा.सोनोपंत दांडेकर, ह.भ.प.धुंडा महाराज देगलूरकर ब्रम्हसूत्रावरील चर्चेसाठी नाऊर येथे येत असत. सन १९३० च्या सुमारास महात्मा गांधी यांच्या नेतृत्वाखाली स्वातंत्र्य संग्रामाचा जोर वाढला होता. संन्याशांनी या चळवळीत सहभागी व्हावे की नाही यासंबंधी स्वामीजींनी श्रृंगेरी मठाच्या शंकराचार्यांशी चर्चा केली. देशभक्ती ही ईश्वर भक्तीच आहे असा निर्णय झाला आणि स्वामीजी स्वातंत्र्य संग्रामात सक्रिय झाले. मिठाच्या सत्याग्रहात त्यांना अटक झाली. गोदावरी आश्रम हे स्वातंत्र्याच्या चळवळीचे प्रमुख केंद्र झाले. श्रीरामपूर, कोपरगाव, राहाता येथे अनेक कार्यकर्ते त्यांच्या नेतृत्वाखाली सहभागी झाले. अनेकदा त्यांना जेलवारी झाली. त्यांची निष्ठा व विद्वता पाहून अखिल भारतीय काँग्रेस कमिटीत सदस्य म्हणून त्यांना घेण्यात आले. अहमदनगर जिल्हा काँग्रेसमध्ये ते १९५२ पर्यंत कार्यरत होते. नगर जिल्ह्यातील श्रीरामपूर, कोपरगाव मतदारसंघातून भाऊसाहेब चौगुले, रामभाऊ गिरमे यांना आमदार म्हणून पाठविण्यात स्वामीजींचा सहभाग होता. १९५२ साली झालेल्या विधानसभेत पुणतांबा येथे जगन्नाथ पाटील बारहाते यांचे नेतृत्व होते. स्वामीजी आजीवन अखिल भारतीय काँग्रेस कार्यकारिणी मंडळाचे सदस्य होते. संजीवनी साखर कारखान्याच्या नोंदणीचा प्रस्ताव केंद्र सरकारकडून नाकारण्यात आला होता. तेव्हा शंकरराव कोल्हे हे स्वामीजींना घेऊन थेट दिल्लीला गेले. पंडितजी भारताचे पंतप्रधान होते. स्वामीजी पंडितजींना म्हणाले, जवाहरलाल प्लीज सँक्शन धीस प्रोजेक्ट.. आणि पंडितजी म्हणाले, सँक्शन.. आणि संजीवनी सहकारी साखर कारखान्याच्या स्थापनेचा मार्ग मोकळा झाला. स्व.यशवंतराव चव्हाण यांच्याकडे स्वामीजींना खूप सन्मान होता. स्व.कर्मवीर भाऊराव पाटील यांच्याशी स्वामीजींचे खूप प्रेमाचे संबंध होते. कोपरगाव येथे रयतचे महाविद्यालय सुरू करण्यात स्वामीजींचा मोठा सहभाग होता. या महाविद्यालयास स्वामीजींचे नाव द्यावे अशीच सर्वांची इच्छा होती. पण स्वामीजी प्रसिद्धीपासून नेहमीच लांब राहत होते. सदगुरू गंगागिरी महाराज हे स्वामीजींचे श्रद्धास्थान होते. त्याप्रमाणे महाविद्यालयास सदगुरू गंगागिरी महाराज यांचे नाव देण्यात आले. नाऊर येथील हायस्कूलला स्वामीजींनी मान्यता मिळवून दिली होती. आमचे वडील स्व.दामूअण्णा देसाई यांनी त्यासाठी दोन एकर जागा बक्षीस दिली. या शाळेलाही स्वामीजींच्या इच्छेनुसार गंगागिरी महाराज यांचेच नाव देण्यात आले आहे. ग्रामीण भागातील विद्यार्थी शिकले पाहिजे ही त्यांची कळकळ होती. त्यासाठी नगर येथे त्यांनी नवभारत छात्र ही बोर्डींग काढली होती. इंटकचे कार्यकर्ते स्व.एल.डी.गांधी बोर्डींगचे व्यवस्थापन पहात असे. त्याकाळी तालुका पातळीवर माध्यमिक विद्यालये व महाविद्यालये नसल्याने अनेक विद्यार्थ्यांना बोर्डिंगचा लाभ घेता आला. बोर्डिंगच्या प्रांगणात स्वामीजींचा पुतळा उभारण्याचा निर्णय गांधी यांनी घेतला होता. मात्र स्वामीजींनी तो नाकारला. कर्मण्येवाधिकारस्ते, मा फलेषू कदाचन.. हे गीता वचन त्यांनी कृतीत आणले होते. त्यांचे महानिर्वाण झाल्यानंतर रयत शिक्षण संस्थेने अध्यापक विद्यालयाला स्वामी सहजानंद भारती असे नाव दिले. नगर येथे असताना त्यांचा मुक्काम नामदेवराव पादीर या भक्ताकडे असे. श्रीरामपूर येथे आमदार रामभाऊ यांच्याकडे, पुणतांबे येथे आमदार जगन्नाथ पाटील बारहाते किंवा भय्याजी यांच्याकडे व कोपरगाव येथे असताना नगरपालिकेचे अध्यक्ष मिस्टर गिरमे यांच्याकडे असत. प्रवासात ग्रंथ हेच त्यांचे सोबती असत. खांडवा (मध्यप्रदेश) येथील प्रसिद्ध उद्योजक जगन्नाथशेठ सराफ यांनी स्वामीजींनी खांडवा येथे यावे असा आग्रह धरला होता. खांडवा येथे सुसज्ज आश्रमाचा प्रस्ताव त्यांनी मांडला होता. पण गंगागिरी महाराजांची पावनभूमी सोडण्यास त्यांनी नम्रपणे नकार दिला. सराला बेट येथे सदगुरू गंगागिरी महाराज बनारस हिंंदू विश्व विद्यालयाच्या धर्तीवर वैैदिक व वारकरी संप्रदायिक विश्व विद्यालय स्थापन करण्याचा त्यांचा मनोदय होता. देवास (मध्यप्रदेश) संस्थानच्या महाराजांनी त्यासाठी अर्थसहाय्य करण्याचे मान्य केले होते. मात्र काही तांत्रिक कारणामुळे ते स्वप्न पूर्ण होऊ शकले नाही. स्वामीजी उतारवयात नाऊर आश्रमात आले. भिक्षा मागून आलेल्या पिठातून सेवेकरी जाडीभरडी भाकरी करी. कुणीतरी भाजी दिली तर उकडलेली भाजी खाण्यासाठी हवी अशी तक्रारही त्यांनी कधी केली नाही. दोन वेळच्या जेवणानंतर ते लगेच वमन करीत असत. त्यांच्या आजारपणाच्या काळात स्वर्गीय भास्करराव गलांडे यांनी त्यांना श्रीरामपूर येथे आणले. त्यांच्यावर उपचार केले. हळूहळू त्यांची प्रकृती खालावत गेली. १५ आॅगस्टचा दिवस होता. त्यांचा जन्मही १५ आॅगस्टचाच होता. स्वामीजींनी क्षीण आवाजात विचारले, आज कौनसी तारीख है, १५ अगस्त है महाराज... असे कुणीतरी म्हणाले. अच्छा म्हणत त्यांनी मान टाकली आणि पार्थिवातून त्यांचा आत्मा स्वतंत्र झाला. एक स्वातंत्र्यसैैनिक मुक्त झाला. भव्य महानिर्वाण महायात्रा नाऊरकडे निघाली. संन्याशाने मोह टाळला पाहिजे एकदा श्रीरामपूर येथे आमदार रामभाऊ गिरमे यांच्याकडे ते मुक्कामी होते. गिरमे आसामी मोठीे होती. त्यांचा मुनीमजी स्वामीजींचा भक्त होता. त्या भक्तीपोटी त्यांनी स्वामीजींचा डोळा चुकवून त्यांच्या ग्रंथात शंभर रुपयांची नोट ठेवली. श्रीरामपूरच्या मुक्कामानंतर स्वामीजी पुणतांबे येथे मुक्कामास गेले. तेथे ग्रंथ उघडून पाहतात तर काय त्यात शंभर रुपयांची नोट! स्वामीजी एकदम दचकले आणि जगन्नाथ पाटलांना जाब विचारला. ही नोट कुणी ठेवली? याचा उलगडा होईना. नंतर चौकशी अंती मुनीमजी यांचे नाव पुढे आले. पैैशापासून ते सदैैव अलिप्त होते. खादी ग्रामोद्योग संस्थेने नाऊर आश्रमात खादी ग्रामोद्योग केंद्र सुरू करावे म्हणून एक लाख रुपये देण्याची तयारी दर्शविली. त्यावेळचे एक लाख रुपये म्हणजे आजचे काही कोटी रुपये. पण स्वामीजींनी तो प्रस्ताव नम्रपणे नाकारला. संन्याशाने हा मोह टाळला पाहिजे असे त्यांचे मत होते.

लेखक : नामदेवराव देसाई (ज्येष्ठ साहित्यिक, नाऊर, श्रीरामपूर)

टॅग्स :AhmednagarअहमदनगरLokmatलोकमत