निवेदनात म्हटले आहे, राज्यातील ७२ हजार आशा व ४ हजार गटप्रवर्तक राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत कार्यरत आहे. माहितीचे अचूक संकलन व अहवाल सादरीकरण, लसीकरण, व्हीएचएनएससी सभा, प्राथमिक आरोग्य केंद्र स्तरावरील बैठक आदी कामे त्यांना करावी लागतात. गट प्रवर्तक पदवीधर महिलांना योग्य वेतन देण्यात यावे, शासकीय कर्मचाऱ्यांचा दर्जा मिळावा, नगर परिषदेमध्ये आशांना कोविड काम करण्यासाठी दैनंदिन ५०० रुपये मानधन मिळावे, ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना कोविडचे काम करण्यासाठी दरमहा एक हजार रुपये व गट प्रवर्तक यांना ५०० रुपये भत्ता देण्यात येत होता. मात्र, मार्चपासून देण्यात आला नाही, तो त्वरित देण्यात यावा. अनेक जिल्हा परिषद व ग्रामपंचायतीमार्फत १ हजार रुपये प्रोत्साहन भत्ता देतात, तो भत्ता ग्रामपंचायत व जिल्हा परिषदेने दिला नाही, तो त्वरित देण्यात यावा. आशा वर्कर यांना १८ हजार रुपये वेतन व गट प्रवर्तक यांना २१ हजार रुपये दरमहा वेतन देण्यात यावे आदी मागण्यांचे निवेदन देण्यात आले.
आशा व गटप्रवर्तक संघटनेचे जिल्हाध्यक्ष कॉ. सुभाष लांडे, तालुकाध्यक्ष कॉ. संजय नांगरे, ग्रामपंचायत कर्मचारी महासंघाचे संजय डमाळ, बाबूलाल सय्यद, आशा व गटप्रवर्तक संध्या पोटफोडे, पी. आर. सातपुते, शीतल थोरवे, अंजली भुजबळ, अनिता भुजबळ, वैशाली भूतकर, भावना नागरे, सुमित्रा महाजन, वैशाली वाघुले, अलका पाचे, स्वाती क्षीरसागर, मीनाक्षी मगर, सुनीता गांडुळे, भाग्यश्री घाडगे, सुनीता सोनटक्के, प्रतीभा गरड, ज्योती गंगावणे, सुशीला गंगावणे, अनिता इंगळे, मीना बोरुडे, सविता भारस्कर, मंगल कोल्हे, सुलभा महाजन आदी उपस्थित होते.
...........
१५ शेवगाव आंदोलन