चोंडी ग्रामपंचायत निवडणुकीत आ. रोहीत पवार यांच्या जनसेवा ग्रामसेवा विकास पॅनेलला ९ पैकी ७ जागा मिळाल्या होत्या. ९ फेब्रुवारी रोजी सकाळी अकरा वाजता सरपंचपदासाठी आशाबाई सुनील उबाळे यांनी अर्ज दाखल केला. त्यांच्या अर्जावर सूचक म्हणून रेणुका दत्तात्रय शिंदे तर उपसरपंचपदी कल्याण रामभाऊ शिंदे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. त्यांच्या अर्जावर गणेश हरीदास उबाळे सुूक होते.
उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या प्रक्रियेत सरपंच व उपसरपंचपदासाठी प्रत्येकी एकच अर्ज दाखल झाले. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून आर. डी. देवैज्ञे, सहायक निवडणूक निर्णय अधिकारी सुखदेव कारंडे यांनी काम पाहिले. यावेळी ग्रामपंचायतीचे सर्व सदस्य उपस्थित होते.