श्रीरामपूर : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचेकडे दूरदृष्टी होती. त्यांनी शेतकरी सुखी तर जग सुखी या संकल्पनेतून शेतकऱ्यांना जाचक करामधून मुक्त केले होते, असे प्रतिपादन अशोक कामगार पतपेढीचे अध्यक्ष भाऊसाहेब दोंड यांनी केले.
अशोक कारखाना कार्यस्थळावर कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नियमांचे पालन करून अत्यंत साधेपणाने अहिल्यादेवी होळकर यांची २९६ वी जयंती साजरी करण्यात आली. यावेळी दोंड बोलत होते. त्यांच्या हस्ते प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. याप्रसंगी कारखान्याचे प्रभारी कार्यकारी संचालक आप्पासाहेब दुशिंग, वित्त व्यवस्थापक निलेश गाडे, कामगार अधिकारी आण्णासाहेब वाकडे, रमेश आढाव, ज्ञानेश्वर बडाख, विलास लबडे, बाळासाहेब मेकडे, दत्तात्रय तुजारे आदी उपस्थित होते.
दोंड म्हणाले, भारतातील तीर्थक्षेत्राच्या ठिकाणी व राज्यात मंदिरे, धर्मशाळा, तलाव, विहिरी, पाणपोई, घाट अशी अनेक समाज उपयोगी कामे त्यांनी केली. त्याकाळात त्यांनी पाण्याचे महत्त्व जाणून पाणी अडवा, पाणी जिरवा ही संकल्पना राबविली. आजच्या आपत्तीच्या काळामध्येही अहिल्यादेवींनी केलेल्या पाणी व्यवस्थापनाची व त्यांच्या उपाययोजनांची अंमलबजावणी होत आहे, असे दोंड म्हणाले.
--------