यावेळी अशोक कारखान्याचे अध्यक्ष भाऊसाहेब कहांडळ, माजी अध्यक्ष सोपान राऊत, माजी संचालक काशिनाथ गोराणे, माजी सरपंच आशिष दोंड, प्राचार्य डॉ. गोरख बारहाते, उप प्राचार्या प्रा. सुनीता गायकवाड, उपप्राचार्य सुयोग थोरात, कार्यालयीन अधीक्षक बाबासाहेब पटारे, ऊस विकास अधिकारी वीरेश गलांडे, रमेश आढाव, प्रा. घोटेकर, आदी उपस्थित होते. प्रचंड वृक्षतोडीमुळे पर्यावरणाचा ऱ्हास होत आहे. त्याचे दुष्परिणाम सर्वांना भोगावे लागत आहेत. अशोक उद्योग समूह पर्यावरण जतनाच्या दृष्टीने कार्यस्थळावर तसेच शैक्षणिक संकुलात गेल्या पंधरा वर्षांपासून वृक्षलागवड अभियान राबवीत आहे. या अंतर्गत लिंब, चिंच, पिंपळ, रेन ट्री अशा मोठ्या झाडांसह बोटल पाम, फर्न, टिकोमा, कोर्डीया अशी विविध प्रकारची फूलझाडे व शोभेची झाडे लावण्यात आल्याचे मुरकुटे यांनी सांगितले. यावेळी शैक्षणिक संकुलाच्या प्रांगणात उपस्थितांच्या हस्ते परिसरात वृक्षारोपण करण्यात आले.
अशोकने केले पर्यावरण संवर्धनाचे काम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 11, 2021 4:14 AM