श्रीरामपूर : अशोक सहकारी साखर कारखाना व्यवस्थापनाने कारखान्याचे मार्गदर्शक माजी आमदार भानुदास ‘मुरकुटे अशोक’ यांच्या आश्वासनानुसार दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर सभासद, बिगर सभासद व कार्यक्षेत्राबाहेरील ऊस उत्पादकांच्या कारखान्याकडे जमा असलेल्या विविध प्रकारच्या ठेवीवरील २०१५-१६ या वर्षाच्या व्याजाची सुमारे १ कोटी १८ लाख रुपयांची रक्कम संबंधितांच्या बँक खात्यावर वर्ग केल्याची माहिती अध्यक्ष कोंडीराम उंडे यांनी दिली. गेल्या गळीत हंगामात गाळप झालेल्या सर्व ऊसाचे एफआरपीप्रमाणे होणारे अंतिम पेमेंट यापूर्वीच अदा करण्यात आलेले आहे. आता दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर सभासद, बिगर सभासद व कार्यक्षेत्राबाहेरील सभासदांच्या सभासद ठेव, बिगर सभासद ठेव, परतीची ठेव, विकास ठेव, डिस्टीलरी ठेव, आधुनिकीकरण ठेव, लेव्ही शुगर ठेव अशा विविध जमा असलेल्या ठेवींवरील व्याजाची सुमारे १ कोटी १८ लाखांची रक्कम १८ आॅक्टोबर रोजी संबंधितांच्या बँक खात्यात वर्ग करण्यात आली आहे.ठेवीवरील व्याजाची बिले २० आॅक्टोबर रोजी संबंधितांना कारखाना शेतकी विभागामार्फत पोहच केली जातील व त्याच दिवशी रक्कम मिळू शकेल. ज्यांची व्याजाची रक्कम शंभर रुपयांच्या आत आहे, त्यांना ती कारखान्यात रोख स्वरुपात मिळेल. तरी संबंधितांनी याची नोंद घ्यावी, असे आवाहन कोंडीराम उंडे, उपाध्यक्ष दत्तात्रय नाईक, कार्यकारी संचालक देवराव लोकरे यांनी केले आहे.
अशोक’ कडून सव्वा कोटी
By admin | Published: October 20, 2016 1:00 AM