कारखाना दररोज साडे चार हजार टन उसाचे गाळप करत आहे. बाहेरील कारखान्यांना दररोज दोन ते अडीच हजार टन उसाचा पुरवठा केला जात आहे. आजअखेर एकूण ४ लाख ५५ हजार टन गाळप पूर्ण झाले आहे. चालू गाळप हंगामात कार्यक्षेञातील नऊ लाख ५० हजार आणि कार्यक्षेञाबाहेरील एक लाख असे १० लाख ५० हजार टन गाळपाचे नियोजन माजी आमदार भानुदास मुरकुटे यांच्या नेतृत्वाखाली व्यवस्थापनाने केले असल्याचे कहांडळ यांनी सांगितले. अशोकने प्रवरा, गणेश, राहुरी, युटेक व संगमनेर या बाहेरील कारखान्यांना ऊस पुरविला आहे. टनाचे गाळप होत आहे. संगमनेरशी एक लाख टन आणि प्रवरा कारखान्याशी दीड लाख टन पुरवठ्याचा करार करण्यात आला आहे. त्यामुळे कोणत्याही शेतकर्याचा ऊस गाळपाविना राहणार नाही, असे कहांडळ यांनी स्पष्ट केले.
मागील वर्षी चांगला पाऊस व पाटपाण्याचे नियोजनामुळे कार्यक्षेत्रात २४ हजार एकर ऊसाची लागवड झाली. यापैकी नोव्हेंबर व डिसेबर २०१९ या दोन महिन्यात १६ हजार एकर उसाची लागवड झाली. यामुळे उसाचे क्षेत्र वाढले. आडसाली उसाची लागवड मात्र नगण्य असल्याने लवकर पक्व होणाऱ्या जातीच्या उसाची व खोडव्याची नियमित तोड तारखेच्या एक महिना अगोदर केली जाते. त्यानंतर कोएम २६५ जातीच्या उसाला तोड मिळते. कोएम २६५ जातीचा ऊस हा १४ ते १८ महिन्यानंतर पक्व होतो. त्यामुळे त्याला साधारणतः फेब्रुवारी ते एप्रिल महिन्यात तोड मिळेल, असे ते म्हणाले.
..............
शेतकऱ्यांना मिळते पावती
शेतकर्यांना उसाच्या नोंदीची रितसर पावती दिली जाते. कर्ज प्रकरणासाठी प्रमाणत्र मिळते. त्यामुळे उसाच्या नोंदीच्या तारखेत फेरफार केला जातो या आरोपात तथ्य नाही.
परिसरातील आजूबाजूच्या कारखान्यांची ऑक्टोबर महिन्यातील ऊस तोड सुरू आहे. बाहेरच्या कारखान्यांना ऊस पुरवठा करणारे लोक अशोकबाबत आकसापोटी तक्रारी करतात, अशी टीका कहांडळ यांनी केली.