आदिवासी विकास विभागातील शासकीय व अनुदानित आश्रमशाळा मागील वर्षी मार्च महिन्यात कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे बंद करण्यात आल्या होत्या. यानंतर या विभागांतर्गत असणाऱ्या ९ वी ते १२ वी पर्यंतचे वर्ग १ डिसेंबर २०२० पासून सुरू करण्यास या विभागातर्फे मान्यता देण्यात आली होती. यानुसार विभागाने कोविडच्या पार्श्वभूमीवर देण्यात आलेल्या सूचनांचे पालन करीत हे वर्ग सुरू झाले. यानंतर शालेय शिक्षण विभागाने २७ जानेवारीपासून इयत्ता ५ वी ते ८ वीचे वर्ग सुरू करण्यास परवानगी दिली. त्यानुसार हे वर्गही सुरू झाले.
यानंतर आदिवासी विकास विभागानेही आपल्या अधिनस्त असणाऱ्या आश्रमशाळातील ५ वी ते ८ वीचे वर्ग,नामांकित शाळा शासकीय वसतिगृहे १५ फेब्रुवारीपासून सुरू करण्यास मान्यता दिली आहे. याबाबत शालेय शिक्षण विभागाने परिपत्रकातील सूचनांचे पालन करावे. वर्ग सुरू झाल्यानंतर आरोग्य, स्वच्छता याबाबतच्या सुरक्षाविषयक उपाययोजनांबाबतची अंमलबजावणी करण्याचे आवाहन केेले आहे.